
T20 World Cup 2026: Will Bangladesh regret not playing in India? They may face these potential penalties; what do the ICC rules say?
T20 World Cup 2026 : बांगलादेश क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषका २०२६ मधून माघार घेतली आहे. दीर्घकाळ चालू असलेल्या वादानंतर, आता बांगलादेश या मेगा स्पर्धेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. बांगलादेश सरकारकडून हा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे बांगलादेश क्रिकेट संघ आयसीसी टी-२० विश्वचषका २०२६ मध्ये खेळताना दिसणार नाही. आता टी२० विश्वचषक २०२६ मधून बांगलादेश संघाने माघार घेतली असल्याने ज्यामुळे सामान्य क्रिकेट चाहत्यांना प्रश्न पडला आहे, की आयसीसीच्या नियमांनुसार त्याला कोणत्या संभाव्य दंडांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे का? त्याबाबत आपण जाणून घेऊया.
हेही वाचा : Ranji Trophy 2026 : सरफराज खानचे निवडकर्त्यांना ‘शतकी’उत्तर! रणजी ट्रॉफीमध्ये तळपली बॅट; वाचा सविस्तर
आयसीसीच्या कोणत्याहीस्पर्धेपूर्वी, सर्व पूर्ण-वेळ कसोटी दर्जाच्या राष्ट्रांनी सहभाग करारावर स्वाक्षरी करावी लागते. जर आयसीसी सुरक्षा संघाला यजमान देशातील एखाद्या विशिष्ट संघाला कोणताही धोका आढळून आला नाही, तर संलग्न राष्ट्रांना पालक संस्थेने मंजूर केलेल्या ठिकाणी खेळणे आवश्यक असते. सध्याची परिस्थिती पाहता,आयसीसीला भारतात कोणताही सुरक्षा धोका आढळलेला नाही. त्यामुळे आता बांगलादेश संघाने घेतलेली माघार त्याला अनेक दंडांना सामोरे जावे लागू शकते.
बांगलादेशाला आपला पहिला सामना ७ फेब्रुवारी रोजी, मेगा इव्हेंटच्या पहिल्या दिवशी भारताविरुद्ध खेळणार होता. आता मात्र बांगलादेश या स्पर्धेत खेळणार नसल्याने त्याचे मॅच पॉइंट्स जप्त करण्यात येऊ शकतात. परंतु, आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलँड खेळणार असल्याने पॉइंट्सबाबत काही कारवाई करता येणार नाही.
‘कराराचे उल्लंघन’ केल्याप्रकरणी बांगलादेशला आयसीसीकडून कारवाईला देखील सामोरे जावे लगूस हकते. याव्यतिरिक्त, बांगलादेश क्रिकेट बोर्डाला आर्थिक दंड म्हणून ऑपरेशनल खर्चाचे (प्रवास, प्रसारण व्यत्यय) नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. २००३ च्या विश्वचषकात, जेव्हा इंग्लंडने वेगवेगळ्या परिस्थितींमुळे झिम्बाब्वे आणि न्यूझीलंडविरुद्ध केनिया न खेळण्याचा निर्णय घेण्यात आला होता तेव्हा दोन्ही देशांचे पॉइंट्स जप्त केले गेले होते.
आयसीसीच्या नियमांनुसार हा एक अतिशय गंभीर गुन्हा मनाला जातो. बांगलादेशने आता स्पर्धेतून माघार घेलयाने या संघाला मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे. यामध्ये त्यांच्या स्पर्धेतील सहभाग शुल्क आणि आयसीसीच्या एकूण महसुलातील वाटा जप्त करणे समाविष्ट आहे. तसेच प्रसारण, प्रायोजकत्व आणि लॉजिस्टिक्समध्ये झालेल्या नुकसानाची भरपाई आयसीसीकडून देखील वसून केली जाईल.
बांगलादेशने माघार घेतल्यामुळे २०२६ च्या टी२० विश्वचषकात त्याच्या जागी कोणता संघ असणार असा प्रश्न पडला होता. यासाठी आयसीसीने आधीच पर्यायी योजना तयार केलेली होती. आयसीसी रँकिंगनुसार, स्कॉटलंडची बांगलादेशचा बदली संघ म्हणून स्पर्धेत निवड करण्यात आली आहे. अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नसली तरी निर्णय जवळजवळ निश्चित मानण्यात येत आहे.
आयसीसीला जर असे वाटले की, बांगलादेशचा विश्वचषकातून माघार घेणे हा राजकीय निर्णय आहे तरबांगलादेशला भविष्यातील स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून संघाला तात्पुरते निलंबित करू शकते.