सरफराज खान(फोटो-सोशल मीडिया)
Sarfaraz Khan scores a century in the Ranji Trophy : भारताचा स्टार फलंदाज सरफराज खानने रणजी ट्रॉफीमध्ये पुन्हा एकदा बॅटने विरोधकांचे तोंड बंद केली आहेत. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात असलेल्या सामन्यात मुंबईकडून खेळताना त्याने हैदराबादविरुद्ध शानदार शतक खेळी केली आहे. जिथे सरफराज खानने त्याच्या दमदार खेळीने त्याच्या संघाला मजबूत स्थितीत आणण्याचे काम केले.
हेही वाचा : PCB ची जाहिरात फसली! भारतीय क्रिकेटपटूंना डीवचण्याचा प्रयत्न अंगलट; चाहत्यांनी उडवली खिल्ली; पहा VIDEO
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि चांगली सुरुवात करण्यात यशस्वी देखील झाला. मुंबई संघाच्या फक्त ८२ धावांत तीन विकेट गेल्या. त्यानंतर सरफराज खानने डाव सावरला आणि शतक झळकवले. सरफराज खानने १२० चेंडूत १०० धावा केल्या. त्यामध्ये त्याने नऊ चौकार आणि चार षटकार मारल्या. ज्यामुळे मुंबईला २५० धावांचा टप्पा पार करता आला.
सरफराज खान हा देशांतर्गत क्रिकेटमध्ये एक गुणी खेळाडू आहे. त्याच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीची आकडेवारी सिद्ध करते की, ६१ सामन्यांमधील हे त्याचे १७ वे शतक ठरले आहे आणि त्यात १६ अर्धशतके लगावली आहे. हे आकडे सरफराजची सातत्याने मोठी धावसंख्या उभारण्याची क्षमता दाखवून देतात. त्याची सरासरी ६० पेक्षा जास्त राहिली आहे. मात्र, शानदार फॉर्ममध्ये असून देखील सरफराज खानला टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.
हेही वाचा : 37 वर्षीय विराट कोहलीच्या फिटनेसचे रहस्य काय? छोले भटुरे खाऊन ‘किंग’ कसं गाजवतो मैदान? वाचा सविस्तर
अलिकडेच सरफराज खान फॉर्म दर्शवितो की तो त्याच्या फॉर्मच्या शिखरावर आहे. डिसेंबरमध्ये, त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शतक ठोकले होते. त्यानंतर, ३१ डिसेंबर रोजी, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये गोवा विरुद्ध १५७ धावांची स्फोटक खेळी खेळली, ज्यामध्ये अनेक षटकारांचा समावेश होता. आणि आता, २२ जानेवारी रोजी, त्याने रणजी ट्रॉफीमध्ये हैदराबादविरुद्ध फक्त १२० चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले. त्याच्या फॉर्म भारतीय संघात परतण्यासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
पहिल्या टी-२० सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताकडून अभिषेक शर्माच्या ८४ धावा, रिंकू सिंगच्या नाबाद ४४ धावा, कर्णधार सूर्यकुमार यादव ३२ धावा आणि हार्दिक पंड्याने २५ धावांच्या जोरावर भारताने ७ गडी गमावून २३८ धावा केल्या. प्रतिउत्तरात न्यूझीलंडकहा संघ निर्धारित षटकात ७ गाडी गमावून १९० धावाच करू शकला. परिणामी, भारताने हा सामना ४८ धावांनी जिंकत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.






