Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bangladesh Voilence : ‘हिंदू विधवेवरील क्रूरतेबद्दल वाचून…’, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर शिखर धवन भडकला 

बांगलादेशमध्ये एका हिंदू महिलेवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनकडून बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jan 08, 2026 | 02:29 PM
Bangladesh Voilence : ‘हिंदू विधवेवरील क्रूरतेबद्दल वाचून…’, बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारावर शिखर धवन भडकला 
Follow Us
Close
Follow Us:

Shikhar Dhawan’s comments on the violence in Bangladesh : बांगलादेशमध्ये अलिकडेच एका हिंदू महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर तिला झाडाला बांधण्यात आले आणि तिचे केस देखील कापण्यात आले. या घटनेने देशातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आणि  अल्पसंख्यांकांवरील वाढता अत्याचार समोर आला आहे. दरम्यान, माजी भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांवर आपली तीव्र चिंता व्यक्त केली आहे.  शिखर धवनने या घटनेवर ट्विट करून दुःख करत पीडितेला न्याय आणि पाठिंबा मिळावा अशी प्रार्थना देखील केली आहे.

हेही वाचा : IND vs NZ ODI Series : ‘ भारतीय गोलंदाजांकडून येणाऱ्या…’ न्यूझीलंड फलंदाज डॅरिल मिचेलने व्यक्त केले मत

शिखर धवनने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर  आपली चिंता व्यक्त करताना लिहिले आहे की, “बांगलादेशातील हिंदू विधवेवरील क्रूरतेबद्दल वाचून मन दुखावले आहे. कोणाविरुद्धही, कुठेही असा हिंसाचार स्वीकार्य होऊ शकत नाही. मी पीडितेला न्याय आणि पाठिंबा मिळावा अशी प्रार्थना करतो. ही घटना बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण करते. ”

बांगलादेशात अशांततेचे वातावरण

सदरील घटना बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांच्या मालिकेचा एक भाग असून देशात अलिकडच्या काळात झालेल्या हिंसक निदर्शनांनंतर, अनेक हिंदूंवर हल्ले होत असल्याचे दिसत आहे. सिंगापूरमध्ये जुलैमध्ये झालेल्या उठावाचे आयोजक शरीफ उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर हे निदर्शने सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी एका २५ वर्षीय हिंदू तरुणाने जमावापासून वाचण्यासाठी कालव्यात उडी मारल्याने त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला. जमावाकडून त्याच्यावर चोरीचा आरोप करण्यात आला होता. भंडारपूर गावातील रहिवासी मिथुन सरकारचा चोरीच्या संशयावरून लोकांनी त्याचा पाठलाग केला होता.

Heartbreaking to read about the brutal assault on a Hindu widow in Bangladesh. Such violence against anyone, anywhere is unacceptable. Prayers for justice and support for the survivor. 🙏 — Shikhar Dhawan (@SDhawan25) January 7, 2026

नेमकं प्रकरण काय?

सोमवारी, जाशोर जिल्ह्यात एक हिंदू व्यापारी आणि कार्यवाहक वृत्तपत्र संपादक राणा प्रताप बैरागी यांची गोळ्या घालून हत्या केली गेली. त्याच दिवशी ४० वर्षीय हिंदू किराणा दुकानाचे मालक शरत मणी चक्रवर्ती यांचा देखील मृत्यू झाला आहे. दुसऱ्या एका घटनेत, एका हिंदू महिलेवर दोन पुरूषांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यांनी तिला झाडाला बांधले आणि तिचे केस देखील कापण्यात आले.

हेही वाचा : विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO

डिसेंबरमध्ये ११ हिंदूंची हत्या

२ डिसेंबर २०२५ पासून बांगलादेशात ११ हिंदूंची हत्या केली गेली. बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने जारी केलेल्या निवेदनानुसार, डिसेंबरमध्ये जातीय हिंसाचाराच्या किमान ५१ घटनांची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Bangladesh violence shikhar dhawan expresses outrage over atrocities against hindus in bangladesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 08, 2026 | 02:29 PM

Topics:  

  • Bangladesh Voilence
  • Shikhar Dhawan

संबंधित बातम्या

वयाच्या 40 व्या वर्षी…शिखर धवन दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात! आयर्लंडच्या जवळच्या मैत्रीणीसोबत जुळणार नातं
1

वयाच्या 40 व्या वर्षी…शिखर धवन दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात! आयर्लंडच्या जवळच्या मैत्रीणीसोबत जुळणार नातं

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच
2

विधवेवर केला बलात्कार, झाडाला बांधले अन्….; नराधमांचे संतापजनक कृत्य, बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचार सुरूच

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
3

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Devkinandan Thakur: “बाळासाहेब ठाकरे असते तर बांगलादेशात हिंदूंच्या….”, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे परखड मत
4

Devkinandan Thakur: “बाळासाहेब ठाकरे असते तर बांगलादेशात हिंदूंच्या….”, देवकीनंदन ठाकूर महाराजांचे परखड मत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.