डॅरिल मिचेल(फोटो-सोशल मीडिया)
New Zealand batsman Daryl Mitchell’s comments : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला सामाना वडोदरा येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. दरम्यान, या न्यूझीलंडचा फलंदाज डॅरिल मिचेलने बुधवारी सांगितले की, त्यांचा संघ सध्या टी-२० विश्वचषकाबद्दल विचार करत नाही, जो अद्याप एक महिना दूर आहे, परंतु भारताविरुद्धच्या आगामी मालिकेत भारतीय गोलंदाजांकडून येणाऱ्या आव्हानावर लक्ष केंद्रित करत आहे.
हेही वाचा : विराट कोहलीसाठी चाहत्यांचा ‘वेडी’ गर्दी! हजारोंच्या गाराड्यात ‘किंग’ अडकला वडोदरा विमानतळावर; पहा VIDEO
विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या अनुभवी खेळाडूंचा समावेश असलेला भारतीय संघ रविवारपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या – एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचा सामना करेल आणि त्यानंतर पाच सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका खेळेल. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत भारत आणि श्रीलंकेत टी२० विश्वचषक होणार आहे.
टीसीएम स्पोर्ट्सने येथे आयोजित केलेल्या न्यूझीलंड क्रिकेट ‘गोल्फ डे’ दरम्यान माध्यमांशी बोलताना मिशेल म्हणाला, आम्ही एका महिन्याच्या आत टी२० विश्वचषकाबद्दल विचार करू. सध्या, आमचे लक्ष भारताविरुद्ध एकदिवसीय मालिका खेळण्यावर आहे, कारण त्यांच्याकडे जसप्रीत बुमराह आणि वरुण चक्रवर्तीसारखे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. न्यूझीलंड क्रिकेट संघासाठी वर्तमानात राहणे आणि समोरील आव्हानावर लक्ष केंद्रित करणे ही गुरुकिल्ली आहे.
मिचेल पुढे म्हणाला की, सर्वात रोमांचक गोष्ट म्हणजे भारतीय परिस्थितीत, खचाखच भरलेल्या स्टेडियमसमोर जागतिक दर्जाच्या भारतीय संघाविरुद्ध खेळण्यासाठी आपल्याकडे तीन एकदिवसीय सामने आहेत. म्हणून आम्ही सध्या वर्तमानावर लक्ष केंद्रित करू. महत्वाचे म्हणजे, जसप्रीत बुमराह आणि चक्रवर्ती एकदिवसीय मालिकेचा भाग नाहीत, परंतु ते टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये खेळताना दिसतील. फिरकीपटूंचा सामना कसा करायचा हे शिकण्यासाठी भारतात खेळण्याच्या त्याच्या अनुभवाचा फायदा घेईल. मी काही काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा भाग होण्यासाठी तुम्हाला जगभरातील वेगवेगळ्या परिस्थितींशी जुळवून घ्यावे लागते. या परिस्थितीत खेळणे मोठे आव्हान आहे.






