विराट कोहलीसाठी चाहत्यांची गर्दी(फोटो-सोशल मीडिया)
A crowd gathered in Vadodara to see Virat Kohli : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ११ जानेवारीपासून तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिला सामाना वडोदरा येथे खेळला जाणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा स्टार खेळाडू विराट कोहली मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी वडोदरा येथे दाखल झाला आहे. दरम्यान, विराट कोहली वडोदरा येथे दाखल होताच चाहत्यांनी त्याच्या भोवती चांगलीच गर्दी केल्याचे दिसून आले. त्यामुळे विमानतळावरून विराटला गाडी गाठण्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागला.
११ जानेवारी रोजी वडोदरा येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वी विराट कोहलीला बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी चांगलीच चर्चेचा विषय ठरली. बुधवारी वडोदरा विमानतळावर कोहलीची एक झलक पाहण्यासाठी मोठी गर्दी जमली होती, ज्यामुळे कोहलीला त्या ठिकाणावरून हलूही शकला नाही. त्यावेळी तो खूपच अस्वस्थ असल्याचे दिसून आला. या प्रकाराचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे.
यावेळी विराट कोहली त्याच्या नवीन लूकमध्ये दिसून आला. त्याने चष्मा आणि काळा टी-शर्ट घातलेला होता. वडोदरा विमानतळावर चाहत्यांनी त्याचे नाव घेतले आणि फोटो आणि सेल्फी काढण्याचा प्रयत्न देखील केला. तथापि, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे त्याला सुरक्षितपणे त्याच्या गाडीपर्यंत पोहोचवण्यात यश आले.
#WATCH | Gujarat: Former Indian Captain and Star Cricketer Virat Kohli arrives at Vadodara for Team India’s ODI match against New Zealand on 11th January. pic.twitter.com/cQbhCghMZy — ANI (@ANI) January 7, 2026
मागील वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून विराट कोहलीने आपल्या बॅटने चांगलाच धुमाकूळ घातला. तो ऑस्ट्रेलियात सलग दोन वेळा शून्यावर बाद झाल्यानंतर, त्याने मालिकेचा शेवट नाबाद अर्धशतकाने केला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या घरच्या वनडे मालिकेत त्याने हा फॉर्म कायम राखत दोन शतके आणि एक अर्धशतक ठोकले. त्यानंतर त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये दिल्लीकडून खेळताना एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले होते. त्यामुळे आता न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत देखील विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
हेही वाचा : 2026 च्या टी-२० विश्वचषकासाठी नेपाळ संघाची घोषणा! ‘या’ खेळाडूंची लागली लॉटरी; रोहित पौडेल करणार नेतृत्व
टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला सुरुवात होण्यासाठी एका महिन्याचा कालावधी शिल्लक असताना २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी न्यूझीलंडने आपला संघ जाहीर केला आहे. न्यूझीलंडचा संघाची धुरा मिचेल सँटनरच्या खांद्यावर सोपवण्यात आली असून सँटनर हा विश्वचषकातील सर्वात अनुभवी खेळाडू असणार आहे, तसेच तो त्याच्या नवव्या आयसीसी स्पर्धेत खेळताना दिसले.






