Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Big Bash League : ऑस्ट्रेलियामध्ये बाबर आझमची नको ती कृती! भारतीय चाहत्यांचा संताप अनावर; वाचा नेमकं काय घडलं? 

बिग बॅश लीग सामन्यादरम्यान बाबर आझमने भारतीय संघाच्या एका चाहत्यावर स्वाक्षरी केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्याला भारतीय चाहत्यांकडून आझमवर टीका करण्यात येत आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Dec 29, 2025 | 07:36 PM
Big Bash League: Babar Azam's inappropriate action in Australia! Indian fans are furious; read what exactly happened?

Big Bash League: Babar Azam's inappropriate action in Australia! Indian fans are furious; read what exactly happened?

Follow Us
Close
Follow Us:

Babar Azam autograph controversy : पाकिस्तानी फलंदाज बाबर आझम एका वादात सापडला आहे. ऑस्ट्रेलियन भूमीवर बाबर आझमने असे काही केले आहे ज्यामुळे त्याला भारतीय चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. घडले आहे की, बिग बॅश लीग सामन्यादरम्यान बाबर आझमने भारतीय संघाच्या एका चाहत्यावर स्वाक्षरी केली. यावेळी चाहत्याने टीम इंडियाची जर्सी घातली होती आणि बाबरकडून त्याच जर्सीवर स्वाक्षरी करण्यात आली होती. बाबर आझमने चाहत्यासोबत सेल्फी देखील काढला. आता  हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

हेही वाचा : ‘कर्णधार होण्यास लायक नाही…’ शुभमन गिलबद्दल इंग्लंडच्या ‘या’ माजी दिग्गज खेळाडूच्या विधानाने उडाली खळबळ

बाबर आझम सापडला वादात

पाकिस्तानचा खेळाडू बाबर आझमच्या एका ऑटोग्राफमुळे तो आता चांगल्याच वादात सापडला आहे.  काही भारतीय चाहते सोशल मीडियावर या घटनेला भारतीय संघाच्या जर्सीचा अपमान म्हणू लागले आहेत. यासाठी बाबर आझमवर तीव्र टीका होऊ लागली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव आधीच वाढला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाने त्यात अधिकची भर पडणार असल्याचे बोलले जात आहे. आता पीसीबी बाबर आझमवर कारवाई देखील होण्याची शक्यता आहे.

बाबर आझमची कामगिरी निराशाजनक

श्रीलंकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी बाबर आझमला पाकिस्तानी संघातून वगळण्यात आले होते. तो आता बिग बॅश लीगमध्ये सिडनी सिक्सर्सकडून खेळताना दिसत आहे. आतापर्यंत त्याची कामगिरी निराशाजनक अशीच राहिली आहे. बाबर आझमला चार सामन्यांमध्ये फक्त ७१ धावाच करता आल्या आहेत. या दरम्यान त्याची सरासरी १७.७ आहे. बाबरचा स्ट्राईक रेट देखील ११० इतका आहे. चारपैकी तीन डावांमध्ये तो दुहेरी आकडा गाठू शकलेला नाही.

हेही वाचा : AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग

बाबर आझम आणि रिझवान बाहेर

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान दोघे देखील  श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत खेळताना दिसणार नाहीत.  पाकिस्तानच्या १५ सदस्यीय संघात शादाब खानचे पुनरागमन झाले असून सलमान अली आघा संघाचे नेतृत्व करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

श्रीलंका मालिकेसाठी पाकिस्तानचा टी-२० संघ खालीलप्रमाणे

सलमान अली आघा (कर्णधार), अब्दुल समद, अब्रार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, ख्वाजा नाफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सैम अयुब, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक.

 

Web Title: Bbl controversy erupts in australia over babar azam signing an indian team jersey

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 07:36 PM

Topics:  

  • Babar Azam
  • Big Bash League

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.