शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
Shubman Gill and Monty Panesar’s commentary : इंग्लंडचा माजी फिरकी गोलंदाज मोंटी पनेसरने शुभमन गिलबद्दल भाष्य केले असून त्याच्या भाष्यामुळे आता क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. मोंटी पानेसरने गिलला सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम करण्यास पात्र नसल्याचे म्हटले आहे. तो शुभमन गिलबद्दल म्हणाला की, “तो निःसंशयपणे एक उत्तम क्रिकेटपटू आहे, परंतु तो तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम पाहण्यास योग्य नाही.” एएनआयशी संवाद साधताना पाननेसरने शुभमन गिलच्या प्रतिभेचे कौतुक देखील केले, परंतु तो सामन्यांदरम्यान आळशी फटके खेळत असल्याचे म्हटले आहे.
हेही वाचा : AUS vs ENG, Ashes 2025 : ICC चा मोठा दणका! बॉक्सिंग डे खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ रेटिंग
पानेसरने “विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता स्पष्ट असून गिल मात्र ते करू शकत नाही. तो एक निष्काळजी क्रिकेटपटू आहे. त्याच्याकडे प्रचंड प्रतिभा देखील आहे, परंतु तो आळशी फटके खेळत असतो. विराट कोहलीची तीव्रता आणि आक्रमकता सर्व फॉरमॅटमध्ये स्पष्ट दिसून येते. मात्र शुभमन गिलकडून ते होऊ शकत नाही. हे त्याच्यासाठी खूप ओझे असून तो सर्व फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून काम करण्यास योग्य नाही. हे काम त्याच्यासाठी खूप जास्त आहे.”
शुभमन गिल एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये भारताची धुरा सांभाळतो. तर सूर्यकुमार यादव टी-२० सामन्यांमध्ये भारताचा कर्णधार आहे. नुकत्याच टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. गिलने आता उपकर्णधारपद देखील गमावले आहे.
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये संघर्ष करताना दिसत आहे. भारतीय कसोटी संघाला मुख्य प्रशिक्षक गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन वेळा व्हाईटवॉशचा सामना करावा लागला आहे. न्यूझीलंडविरुद्ध ३-० असा तर दक्षिण आफ्रिकाविरुद्ध २-० असा पराभव पत्करावा लागला आहे. गौतम गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळाबद्दल पनेसरला विचारण्यात आल्यानंतर इंग्लंडचा माजी गोलंदाज पानेसर म्हणाला की, “गंभीर हा एक चांगला व्हाईट-बॉल प्रशिक्षक आहे कारण तो त्या स्वरूपात चांगलाच यशस्वी झाला आहे, गंभीर रणजी ट्रॉफी क्रिकेटमध्ये रेड-बॉल प्रशिक्षक बनू शकतो आणि त्याने रेड-बॉल क्रिकेटमध्ये संघ कसा तयार करायला हवा याबद्दल रणजी ट्रॉफी प्रशिक्षकांशी त्याने बोलायला हवे.”






