ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड कसोटी सामना(फोटो-सोशल मीडिया)
ICC delivers a major blow to Melbourne Cricket Ground : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची अॅशेस मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील ३ सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत तर चौथा सामना इंग्लंडने आपल्या खिशात टाकला आहे. दरम्यान, आयसीसीने वादग्रस्त एमसीजी खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ दर्जा दिल आहे. आयसीसीकडून चौथ्या अॅशेस कसोटी सामन्याचे ठिकाण असलेल्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील खेळपट्टीला ‘असमाधानकारक’ म्हणून रेटिंग देण्यात आले आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना खेळला गेला आहे. या सामन्यात इंग्लंडने ऑस्ट्रेलियाचा ४ विकेट्सने पराभव केला. हा कसोटी सामना अवघ्या २ दिवसात संपला. दोन दिवसात ३६ विकेट्स गेल्या. आयसीसीने या खेळपट्टीला असमाधानकारक असे म्हटले आहे. तसेच आयसीसीने खेळपट्टी आणि आउटफील्ड देखरेख प्रक्रियेअंतर्गत या ठिकाणाला एक डिमेरिट पॉइंट देखील दिला आहे.
खेळपट्टिबाबत एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेल मॅच रेफरी जेफ क्रो यांनी निकाल जाहीर केला आणि खेळपट्टीच्या मूल्यांकनामागील कारण देखील स्पष्ट केले. क्रो म्हणाले की, “एमसीजी खेळपट्टी गोलंदाजांसाठी अत्यंत प्रतिकूल होती. पहिल्या दिवशी २० विकेट्स पडल्या, दुसऱ्या दिवशी १६ विकेट्स पडल्या आणि कोणत्याही फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आले नाही. म्हणून, मार्गदर्शक तत्त्वांनुसार, खेळपट्टी ‘असमाधानकारक’ होती आणि त्या ठिकाणाला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे.”
हेही वाचा : Abhishek Sharma : बापरे ठोकले 45 षटकार! पंजाबचा कर्णधार अभिषेक शर्माचे वादळी सराव सत्र
इंग्लंडने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. इंग्लंडच्या जोश टोंगने ४५ धावांत ५ विकेट्स घेतल्या आणि ऑस्ट्रेलिया १५२ धावांवर सर्वबाद झाला. इंग्लंडने लहान लक्ष्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला खरा, परंतु इंग्लंड ३० षटकांतच ११० धावांवर गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी आपला तिसरा डाव सुरू केला आणि एकूण २० विकेट्स गमावल्या. दुसऱ्या डावातही हाच ट्रेंड कायम राहिला, जिथे ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या सातत्यपूर्ण गोलंदाजीमुळे १३२ धावा केल्या परिणामी इंग्लंडला १७८ धावांचे लक्ष्य मिळाले आणि इंग्लंडने ही लक्ष्य ६ विकेट्स गमावून पूर्ण केले आणि या मालिकेत पहिला सामना जिंकला.






