
Will Mustafizur Rahman enter the IPL in 2026? The BCB chief's statement has sparked discussion.
BCB chief’s comments about Mustafizur Rahman : बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ मधून मुक्त करण्यात आले आहे. बांग्लादेशमध्ये हिंदू अत्याचारच्या घटना घडल्याने भारत आणि बांग्लादेश यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. याचा परिणाम आयपीएल २०२६ च्या स्परदहेवर देखील झाला आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याला आगामी हंगामातून मुक्त करण्याचा आदेश दिल आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात त्याला केकेआर संघाने ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले होते. दरम्यान मुस्तफिजूर रहमानच्या आयपीएलमदये परतण्याबाबत बीसीबी प्रमुखांनी आता भाष्य केले आहे.
आयपीएलमधून रहमानची सुटका झाल्यानंतर, सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अफवा पसरू लागल्या आहेत आय, बीसीसीआय आपल्या निर्णयावर पुनर्विचार करत असून मुस्तफिजूर रहमान येत्या हंगामासाठी परतण्याची शक्यता आहे. परंतु, या अफवांमध्ये काही एक तथ्य नि. बीसीबी अध्यक्षांकडून देखील हे दावे स्पष्टपणे नाकारण्यात आले आहेत.
बीसीबी अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुल यांनी सांगितले की, “मुस्तफिजूरच्या आयपीएलमध्ये परतण्याबाबत माझा बीसीसीआयशी काही एक लेखी किंवा तोंडी संपर्क झालेला नाही. मी माझ्या कोणत्याही बोर्ड सदस्यांशी याबद्दल बोललो देखील नाही. या बातमीत काहीही तथ्य नाही.”
हेही वाचा : IPL 2026 : IPL मध्ये मुस्तफिजूर रहमान मालामाल! जाणून घ्या बंदीपूर्वी केली ‘इतकी’ कमाई
बांग्लादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान पहिल्यांदा २०१६ मध्ये आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. त्याला सनरायझर्स हैदराबाद संघाने १.४० कोटी रुपयांना आपल्या संघात सहभागी केले होते. पुढच्या हंगामात तो त्याच फ्रँचायझीसोबत देखील दिसला होता. आयपीएल २०१७ साठी, एसआरएच संघाने त्याला त्याच रकमेत कायम ठेवण्यात आले होते.
मुस्तफिजूर रहमान २०२४ मध्ये शेवटचा आयपीएलमध्ये खेळताना दिसला होता. त्या काळात तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. त्याला २.२ कोटी फी मिळाली होती. तो २०२५ मध्ये खेळू शकला नव्हता होता. २०२६ च्या आयपीएलमध्ये केकेआरने मुस्तफिजूर रहमान त्याला २०२६ च्या आयपीएलसाठी ₹९.२० कोटी (९.२० कोटी) मध्ये आपल्या ताफ्यात घेतले होते. तथापि, त्याच्या सुटकेनंतर, त्याला आता हे पेमेंट मिळणार नाही. आतापर्यंत, मुस्तफिजूर रहमानने एकूण सात आयपीएल हंगामात भाग घेतला असून त्याला ₹१२ कोटी फी मिळालेली आहे.