Mustafizur Rahman News: भारत-बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा वाद उफाळला आहे! मुस्तफिजुर रहमानला केकेआरमधून काढल्याने बांगलादेश सरकार संतापले असून, थेट आयपीएल प्रसारणावर बंदी घालण्याची तयारी सुरू केली आहे.
बीसीसीआयने मुस्तफिजूर रहमानला आयपीएल २०२६ च्या लिलावातून वगळण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. माजी भारतीय कर्णधार अझरुद्दीन यांनीही या प्रकरणावर आपले मत व्यक्त केले.
बांगलादेश क्रिकेट बोर्डाला क्रीडा मंत्रालयाकडून त्यांचे टी२० विश्वचषक लीग सामने भारताऐवजी श्रीलंकेत हलविण्याचे निर्देश मिळाले. या धमकीला बीसीसीआयच्या एका सूत्राने आता योग्य उत्तर दिले आहे.
बांगलादेशमध्ये सध्या हिंदूंवर अत्याचार होत आहेत. म्हणूनच बीसीसीआयने मुस्तफिजूरला आयपीएलमधून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. बांगलादेशचे क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांनी आता या प्रकरणावर आपले मौन सोडले आहे.
2026 सालची सुरुवात कोलकाता नाईट रायडर्सच्या चाहत्यांसाठी एका मोठ्या निर्णयाने झाली आहे. BCCI च्या कडक सूचनांनुसार, फ्रँचायझीने ९.२० कोटी रुपयांचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला संघातून मुक्त केले
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) सरचिटणीस देवजीत सैकिया यांनी आयपीएल फ्रँचायझी कोलकाता नाईट रायडर्सला बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमानला त्यांच्या संघातून सोडण्याचे निर्देश दिले आहेत.
१९ व्या हंगामाच्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजूरला ९.२० कोटी रुपयांना विकत घेतले. लिलावात विकला गेलेला तो एकमेव बांगलादेशी खेळाडू आहे. मुस्तफिजूरवर झालेल्या गदारोळानंतर बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आपले मौन सोडले आहे.
केकेआरचे सह-मालक आणि बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान यांना कोलकाता नाईट रायडर्सने लिलावात ९.२० कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर त्यांच्यावर कडक टीका होत आहे. त्याचबरोबर त्याच्यावर अनेक आरोप देखील लावले जात आहेत.
बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला आयपीएल २०२६ च्या मिनी-लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने ९.२० कोटी रुपयांना खरेदी केले. रहमानला २०२६ च्या आयपीएलमध्ये खेळण्यास बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे.