Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs AFG: अफगाणिस्तान मालिकेपूर्वी BCCIचा मोठा निर्णय! टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मराठमोळ्या दिग्गजाची एन्ट्री

BCCI Appoints Sairaj Bahutule Team Indias Spin Bowling Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने अफगाणिस्तान मालिकेपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने साईराज बहुतुले यांची संघाचे नवीन फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 03, 2026 | 01:32 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • BCCIचा मोठा निर्णय
  • टीम इंडियाच्या स्टाफमध्ये मराठमोळ्या दिग्गजाची एन्ट्री
  • बीसीसीआयने जारी केले निवेदन
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.बीसीसीआयने माजी भारतीय क्रिकेटपटू साईराज बहुतुले यांची भारताच्या वरिष्ठ पुरुष संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. भारतीय संघाच्या सहाय्यक प्रशिक्षक गटात आता अनुभवी स्पिन तज्ज्ञाची भर पडली असून, हा निर्णय आगामी आंतरराष्ट्रीय मालिकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा मानला जात आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना ६ जूनपासून मुल्लानपूर येथे खेळला जाईल. या सामन्यात भारताचे नेतृत्व शुभमन गिल करेल.

Rajat Patidar: एक संधी अन् घडला इतिहास! रिप्लेसमेंट खेळाडू बनला IPL चा चॅम्पियन कर्णधार; रजत पाटीदारने बदललं RCB चं नशीब

बीसीसीआयने जारी केले निवेदन

बीसीसीआयने एक अधिकृत निवेदन जारी करत म्हटले की, ‘बीसीसीआयला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, साईराज बहुतुले यांची भारतीय क्रिकेट संघाच्या (वरिष्ठ संघाच्या) फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.’ ६ जूनपासून न्यू चंदीगड येथे भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना येथे खेळवला जाणार आहे. हा सामना बहुतुले यांचा भारतीय संघासोबतचा पहिला अधिकृत दौरा असेल.

🚨 News 🚨 BCCI appoints Sairaj Bahutule as India’s Spin Bowling Coach. More Details 🔽 | #TeamIndiahttps://t.co/DYgHNIX7E5 — BCCI (@BCCI) June 2, 2026

बहुतुले यांची पहिली प्रतिक्रिया

नियुक्तीनंतर साईराज बहुतुले यांनी आनंद व्यक्त करत भारतीय क्रिकेटसाठी योगदान देण्याची ही मोठी संधी असल्याचे म्हटले. बहुतुले म्हणाले, ‘भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती होणे, हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. एक खेळाडू म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची बाब होती, आणि आता पुन्हा एकदा प्रशिक्षणाच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटमध्ये योगदान देण्याची संधी मिळाली, हे माझ्यासाठी खूप खास आहे. मी खेळाडूंसोबत काम करण्यास आणि संघाला सर्व फॉरमॅटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी योगदान देण्यास उत्सुक आहे.’

कोचिंग क्षेत्रातील मोठा अनुभव

क्रिकेट कारकिर्दीनंतर साईराज बहुतुले यांनी अनेक संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही प्रभावी कामगिरी केली आहे. त्यांनी विदर्भ, केरळ, गुजरात आणि बंगाल या संघांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केले. तसेच त्यांनी आयपीएल फ्रँचायझी राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्जसारख्या संघांमध्ये स्पिन बॉलिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. बहुतुले हे २०२२ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक विजेत्या संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक होते आणि २०२४ च्या विश्वचषकातही ते कोचिंग स्टाफचा भाग होते. त्यांनी इंडिया ‘अ’ आणि वरिष्ठ पुरुष संघांसाठी विशेषज्ञ गोलंदाजी प्रशिक्षक म्हणूनही काम केले आहे. बहुतुले हे २०२१ ते २०२४ या काळात बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (सेंटर ऑफ एक्सलन्स) येथील कोचिंग स्टाफचे एक प्रमुख सदस्य होते.

बहुतुले यांची क्रिकेट कारकिर्द

हे भारताचे माजी खेळाडू असून देशांतर्गत क्रिकेटमधील महान खेळाडूंपैकी एक मानले जातात. साईराज बहुतुले यांनी भारतासाठी दोन कसोटी आणि आठ एकदिवसीय सामने खेळले आहेत. मात्र, देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्यांनी मोठे नाव कमावले. त्यांची प्रथम-श्रेणी कारकीर्द जवळपास दोन दशकांची होती. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी ६१७६ धावा आणि तब्बल ६३० विकेट्स घेतल्या आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भारतीय संघातील युवा फिरकीपटूंना होणार असल्याचे मानले जात आहे.

IPL 2027 पूर्वी ‘या’ संघाच्या कर्णधारांचा होणार गेम; टीम मॅनेजमेंट ॲक्शन मोडमध्ये

Web Title: Bcci appoints sairaj bahutule as india spin bowling coach ahead of ind vs afghanistan series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • BCCI India
  • IND vs AFG
  • Team India head coach

संबंधित बातम्या

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश
1

प्रचंड मोठी खळबळ! BCCI ची ६४ खेळाडूंवर बंदीची कारवाई; Rohit सह ‘या’ खेळाडूचा समावेश

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश
2

IND vs AFG: 8 खेळाडूंमध्ये फेरबदल, आता श्रेयस अय्यरच्या टीमला रोखणे अशक्य; दमदार खेळाडूंचा समावेश

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी
3

IND Vs AFG: तूफान येणार, अन् अफगणिस्तान वाहून जाणार; टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीला संधी

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी  Hardik Pandya ला दुखापत
4

मोठी खळबळ! Team India ला मोठा धक्का? अफगाणिस्तान सिरीजआधी Hardik Pandya ला दुखापत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.