Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BCCI Centenary Year : BCCIची वार्षिक बैठक संपली, बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

BCCI Centenary Year : शुक्रवारी बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यात आगामी निवड समिती अध्यक्षांबाबत चर्चा करण्यात आली. तसेच बीसीसीआयच्या शताब्दी वर्षाची सुरुवात करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Sep 18, 2026 | 08:22 PM
BCCI AGM

BCCI AGM

Follow Us
Follow Us:

 

  • बीसीसीआयच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा
  • एमसीएची बीसीसीआयकडे प्रमुख मागणी
  • बीसीसीआयच्या शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात
 

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डा (BCCI)ची वार्षिक सर्वसाधारण सभा ( AGM) शुक्रवारी पार पडली. या बैठकीत निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यासह बोर्डाच्या शताब्दी वर्षाच्या (BCCI Centenary Year) तयारीबाबतही माहिती देण्यात आली.

दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष अजीत आगरकर यांचा कार्यकाळ ६ ऑक्टोबर २०२६ ला संपणार आहे. अशात बीसीसीआय त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाचा शोध घेत आहे. निवड समितीबाबत निर्णय घेण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती बैठकीनंतर बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांना दिली. त्याशिवाय त्यांनी इतर कोणतीही माहिती प्रसारमाध्यमांना दिली नाही.  बीसीसीआयच्या ९५ व्या एजीएममध्ये विविध राज्य क्रिकेट संघाच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. या बैठकीत बंगाल क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी व भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी व माजी वेगवान गोलंदाज व्यँकटेश प्रसाददेखील उपस्थित होते.

एमसीएची बीसीसीआयकडे प्रमुख मागणी

वरिष्ठ निवड समितीच्या अध्यक्षांच्या निवडीशिवाय बीसीसीआय ज्यूनियर निवड समितीच्या सर्व पाच पदांना भरण्याच्या प्रक्रियेबाबत ही विचार करत आहे. यादरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)ने बोर्डाकडे काही प्रमुख सामन्यांवेळी मुंबईचा प्रामुख्याने विचार करण्यात यावा अशी विनंती केली आहे. एमसीएचे सचिव उन्मेष खानविलकर यांनी याबाबत माहिती दिली. प्रतिष्ठीत वानखेडे स्टेडियममध्ये मागील दोन वर्षांपासून कोणताही कसोटी सामना खेळवला गेला नाही. येथे मागील अखेरचा कसोटी सामना हा २०२४ च्या अखेरीस न्यूझीलंडविरुद्ध खेळवला गेला होता. वानखेडेमध्ये पार पडणाऱ्या आगामी क्रिकेट सामन्यांचा विचार करता, येथे पुढील वर्षाच्या सुरुवातीला पहिल्यांदा आयोजित होणाऱ्या महिला चॅम्पियन्स लीग व महिला प्रीमियर लीगच्या काही सामन्यांचा समावेश आहे.

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

शताब्दी वर्षाच्या तयारीला सुरुवात

बीसीसीआयने बैठकीनंतर एक प्रसिद्धीपत्रक जारी केली. त्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगण्यात आले की, २०२८मध्ये पार पडणाऱ्या बीसीसीआयच्या शताब्दी वर्षाच्या आयोजनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. हे शताब्दी वर्ष डिसेंबर २०२७ ला सुरू होत २०२८ पर्यंत वर्षभर विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरे केले जाणार आहे. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात हा एक महत्त्वपूर्ण क्षण ठरणार असल्याचेही नमुद करण्यात आले आहे.

Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन

Web Title: Bcci centenary year

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Ajit Agarkar
  • BCCI India
  • MCA

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?
1

Breaking: क्रिकेट विश्वात खळबळ उडणार! अजित आगरकरांचा पत्ता कट? ‘हा’ खेळाडू नवा चीफ सिलेक्टर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.