अजित आगरकर (फोटो- सोशल मिडिया)
या संपूर्ण घडामोडींच्या दरम्यान भारताचा माजी यष्टीरक्षक आणि फलंदाज पार्थिव पटेल याने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे. पार्थिवने आपल्या पोस्टमध्ये असलेल्या व्हीडिओमुळे नवीन चर्चा सुरू झाल्या आहेत. या पोस्टचे क्रिकेट चाहत्यांकडून आणि विश्लेषकांकडून वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत.
Gautam Gambhir : संजूबाबतचा तो निर्णय माझ्यासाठी कठीणच… संघ निवडीबाबत गंभीर यांनी सोडले मौन
माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेल याचे नाव या शर्यतीत आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. अशातच पार्थिवने सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या प्रचंड व्हायरल होत असून, त्यामुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. पार्थिव पटेलने आपल्या पोस्टमध्ये थेट कोणताही उल्लेख केला नसला, तरी इशाऱ्या-इशाऱ्यांमध्ये बरंच काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या पोस्टमागे त्याचा नक्की काय उद्देश होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अजित आगरकर यांच्याऐवजी आता पार्थिव पटेल नवा चीफ सिलेक्टर होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे.
Coming soon. I'm in. pic.twitter.com/C5Nfq8kv5b — Parthiv Patel (@parthiv9) September 18, 2026
आगरकर यांची जुलै २०२३ मध्ये बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्तेपदी नियुक्ती करण्यात आली होती. ऑक्टोबर 2026 मध्ये त्यांचा कार्यकाळ समोनर असल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आता पार्थिव पटेलने केलेल्या या सोशल मिडियावरील पोस्टमुळे नवीन चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात काय घडणे हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…
गौतम गंभीर काय म्हणाला?
हार्दिकने आयपीएलनंतर एकही सामना खेळलेला नाही. सध्याच्या घडीला तो एकदिवसीय सामन्यांमध्ये 10 ओव्हर्स गोलंदाजी करण्याइतपत देखील फिट नाहीये. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये क्रिकेटचा ताण जास्त असतो. त्यामुळे हार्दिक पांड्याला घाईघाईत स्थान देऊन त्याच्या दुखापतीचा धोका आम्हाला वाढवून द्यायचा नाही.






