फोटो सौजन्य - X
नवी दिल्ली : जर कोणी असे म्हणाले की, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनने एकट्याच्या जोरावर भारताला २०२६ चा टी-२० विश्वचषक जिंकून दिला, तर ते चुकीचे ठरणार नाही. संजूने ज्याप्रकारे महत्त्वाच्या सामन्यात भारताला खेळपट्टीवर टिकून विजय मिळवून दिला, नक्की त्याचमुळे भारतीय क्रिकेट संघ विश्वविजेता बनू शकला. पण त्यानंतर तीन सामन्यातील खराब खेळीमुळे संजूला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर करण्यात आले. आता संघात त्याचे पुनरागमन झाले असून त्याने दोन खणखणीत अर्धशतकही झळकावलेत. या संपूर्ण घडामोडीदरम्यान भारताचे हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर का केले होते? याबाबत महत्त्वाची प्रतिक्रिया देत, मौन सोडले आहे.
अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर प्रथमच प्रसारमाध्यमांना सामोरं जाताना भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक असलेल्या गौतम गंभीर यांनी अनेक विषयांना हात घातला. यावेळी संजू सॅमसनबाबत बोलताना ते म्हणाले की, असे कोणीही विश्वचषकात ‘मालिकावीर’ ठरत नाही. त्यासाठी प्रतिभेची गरज असते. ती प्रतिभा संजूमध्ये आहे. संजूला इंग्लड मालिकेतून बाहेर करण्याच्या निर्णयाबाबत गंभीर म्हणाले की, निश्चितच, तो निर्णय माझ्यासाठी कठीण होता. त्याने याअगोदर ज्याप्रकारे कामगिरी केली होती, ते पाहता एखाद्यावेळेस माझ्या प्रशिक्षणाच्या कार्यकाळात इंग्लंड मालिकेतून त्याला बाहेर ठेवणे, हा निर्णय माझ्यासाठी कठिणच राहिला. पण अनेक वेळा तुम्हाला खेळाडूंचा सध्याचा फॉर्मही लक्षात घ्यावा लागतो.
झिम्बाब्वेचा सुपडासाफ! Travis Head ने ठोकले खणखणीत शतक; 75 बॉल्समध्ये थेट…
गंभीर यांनी स्पष्ट केले की, वैभव सूर्यवंशीला पुढील संधीसाठी वाट पहावी लागेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेतील संघ अगोदच निश्चित झाला होता. विश्वचषकादरम्यान यशस्वी राहिलेले नियोजन पुन्हा आणले जाईल. आमचा दृष्टीकोन अगोदरच स्पष्ट होता की, या मालिकेतून आम्ही विश्वचषकाच्या तयारीला डोळ्यासमोर ठेवणार आहोत. तसेच तीन ते चार वेळा मिळालेल्या अपयशाने एखाद्या क्रिकेटरने आपला फॉर्म गमावला असे म्हणणे चुकीचे ठरेल.
सूर्यवंशीबाबत गंभीर म्हणाले की, आमची त्याच्यासोबत चर्चा झाली असून तुला संधीसाठी वाट पहावी लागेल हे आम्ही त्याला स्पष्ट केले आहे. संघ व्यवस्थापनेला त्याच्यातील प्रतिभा व क्षमता पूर्णपणे ठाऊक आहे. यापुढे संघ निवडताना अनेक दिवस चांगल्या फॉर्मात असलेल्या खेळाडूचा विचार केला जाईल. या प्रकरणी मागील दोन वर्षांपासून सलग चांगली कामगिरी करणारा खेळाडू त्या खेळाडूच्या पुढे असेल ज्याची सध्याच संघात निवड झाली आहे.
T20 क्रिकेटमध्ये Jos Buttler ची ‘दादागिरी’; असा विक्रम करणारा पहिलाच फलंदाज, पोलार्डला दिला ‘झटका’






