चेन्नई अन् गुजरातच्या मॅचचे ठिकाण बदलले (फोटो- सोशल मिडिया)
गुजरातमध्ये होणार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका
चेन्नई अन् गुजरात सामन्याचे शेड्यूल बदलले
चाहत्यांसाठी समोर आली महत्वाची बातमी
Tata IPL CSK Vs GT Updates: आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. चाहत्यांना रोज रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. मात्र आता चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीसीसीआयने आयपीएलच्या शेड्यूलमध्ये बदल केले आहेत. गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जच्या मॅचच्या ठिकाणांमध्ये बदल करण्यात आला आहे. त्याबाबत आपण जाणून घेऊयात.
26 एप्रिल 2026 रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना होणार आहे. हा सामना गुजरातमधील अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. मात्र आता त्यामध्ये बदल करण्यात आले आहेत. हा सामना अहमदाबादच्या स्टेडियम ऐवजी एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. हा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होणार आहे.
21 मे च्या सामन्यात देखील केला बदल
चेन्नई सुपर किंग्जने 5 वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. तर गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलची ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलमधला चेन्नई विरुद्ध गुजरात हा सामना 21 मे ला होणार आहे. याचे ठिकाण देखील बदलण्यात आले आहे. हा सामना चेपॉक स्टेडियमवर होणार होता. आता तो सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. हा सामना संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होणार आहे.
नेमके कारण काय?
गुजरात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. बीसीसीआयला हा बदल निवडणुकीमुळे करावा लागला आहे. 26 एप्रिल रोजी अहमदाबाद आणि गुजरातमधील अनेक भागात निवडणूक होणार आहे. त्यामुळे हे बदल करण्यात आले आहेत.






