Moong Dal Paratha Recipe: जर तुम्हालाही बटाटा किंवा मेथीचा पराठा खाऊन कंटाळ आला असेल. तर ही हेल्दी आणि टेस्टी मूग डाळीच्या पराठ्याची रेसिपी एकदा नक्की ट्राय करा.
Moong Dal Paratha Recipe
Follow Us:
Follow Us:
विस्तार
नाश्त्यात प्रोटीनचा डोस हवा?
काही मिनिटांत बनवा मूगडाळीचे पराठे
रेसिपी नक्की ट्राय करा
Moong Dal Paratha: हिवाळ्यातील थंड वातावरणात अनेकांना काहीतरी गरमागरम, चमचमीत आणि टेस्टी खाण्याची इच्छा होते. तुम्ही अनेकदा बटाटा, मेथी, पनीर किंवा मुळा यांचा पराठा खाल्ला असाल. परंतु, जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही तरी हेल्दी किंवा टेस्टी खायचं असेल तर मूगडाळीचे पराठे एकदा नक्की ट्राय करा. मूगाच्या डाळीत प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात आढळतात. त्यामुळे मूगडाळीचे पराठे नाश्त्यासाठी चविष्ट आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतात. विशेष म्हणजे, तुम्ही घरातील उपलब्ध साहित्य वापरून ही सोपी झटपट तयाकर करु शकता. चला तर जाणून घेऊया मूगडाळीचे पराठे बनवण्याची सोपी रेसिपी.
सर्वप्रथम भिजवलेल्या मूगडाळीतील पाणी काढून घ्या. त्यानंतर मिक्सरमध्ये डाळ घालून जाडसर वाटून घ्या. यानंतर, एका कढईत तेल चांगले गरम करून घ्या. तेल गरम झाल्यावर यामध्ये जिरे आणि हिंग घाला. त्यानंतर आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता हळद, लाल तिखट आणि मीठ घालून मंद आचेवर मसाला शिजवा. त्यात वाटलेली मूगडाळ घालून मिश्रणातील ओलावा कमी होईपर्यंत व्यवस्थित शिजवा. शेवटी कोथिंबीर घालून हे मिश्रण थंड होऊ द्या. आत, गव्हाच्या पिठात पाणी घालून मऊसर नीट पीठ मळून घ्या. त्याचे गोळे करून त्यात मूगडाळीचे मिश्रण भरा. नंतर हलक्या हाताने पराठे लाटून घ्या. तवा चांगला गरम झाल्यावर पराठे दोन्ही बाजूंनी तूप किंवा तेल लावून खरपूस भाजून घ्या. तुम्ही हे मूगडाळीचे गरमागरम पराठे दही, हिरवी चटणी किंवा लोणच्यासोबत सर्व्ह करु शकता.
मूगडाळीचे पराठे बनवताना या ५ टिप्स लक्षात ठेवा
मूगडाळ किमान २ ते ३ तास भिजवा.
डाळ वाटताना जास्त पाणी घालून मिश्रण पातळ करु नका.
पराठे नेहमी हलक्या हाताने लाटा. अन्यथा ते फाटू शकतात.