
IND VS AUS: Is Rohit-Virat's cricket career over? Ajit Agarkar trolled; BCCI's big decision..
नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांची संघात निवड करण्यात आली आहे. जर या दोघांनी या मालिकेत आपली शानदार कामगिरी केली नाही तर मात्र, त्यांना संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. अशी चर्चा आता रंगू लागली आहे. त्यामुळे मुख्य निवडकर्ते अजीत आगरकर यांना या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांकडून मोठ्या टिका सहन करावी लागत आहे. परंतु, अशातच अजीत आगरकर यांच्याबाबत बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
बीसीसीआयने अजीत आगरकर यांचा कार्यकाळ वाढवला आहे. आगरकर यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत वाढवण्यात आला आहे. ते भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे वरिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष म्हणून पुढे देखील कार्यरत असणार आहेत. भारतीय संघाच्या यशस्वी प्रवासाचा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे. आगरकर जुलै 2023 मध्ये मुख्य निवडकर्ता म्हणून निवड झाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 च्या आयसीसी विश्वचषकातमध्ये अंतिम फेरीत धडक मारली होती तसेच 2024 मध्ये टी20 विश्वचषक आणि 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जेतेपद देखील जिंकले होते. या यशामुळे बीसीसीआयकडून त्यांचा कार्यकाळ वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना एका बीसीसीआयच्या अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले की,”अजित आगरकर यांच्या कार्यकाळात भारतीय संघाने अनेक विजेतेपदे आपल्या नावे केली, तसेच टेस्ट आणि टी20 स्वरूपात देखील मोठे बदल घडले आहेत. बीसीसीआयने त्यांचा करार जून 2026 पर्यंत वाढवला असून, अजित आगरकर यांच्याकडून काही महिन्यांपूर्वीच हा प्रस्ताव मान्य करण्यात आला आहे.”