रोस्टन चेस आणि शुभमन गिल(सोशल मीडिया)
हेही वाचा : गोल्डन बॉय करणार पुनरागमन! नीरज चोप्रा स्वीस व्हॅलीजमध्ये नव्या हंगामासाठी गाळतोय घाम
वेस्ट इंडिज दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न करणार आहे. पहिल्या कसोटीत वेस्ट इंडिज संघाची कामगिरी खराब राहिली होती, ही कसोटी अवघ्या अडीच दिवसांतच संपली. त्यामुळे, वेस्ट इंडिज दिल्ली कसोटी सामन्यात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. वेस्ट इंडिज पहिल्या डावात १६२ आणि दुसऱ्या डावात १४६ धावांवर सर्वबाद झाला होता. वेस्ट इंडिजने पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४० धावांनी गमावला.
या कसोटी मालिकेतील दुसरा कसोटी सामना उद्या, १० ऑक्टोबर रोजी सुरू होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:३० वाजता खेळवला जाणार आहे. सामन्यापूर्वी टॉस सकाळी ९:०० वाजता होईल. हा सामना कधी, कुठे आणि कसा पाहायचा, तसेच तो तुमच्या फोनवर कसा पाहायचा ते आपण जाणून घेऊया. हा सामना १० ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान खेळला जाईल.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर प्रसारित करण्यात येणार आहे. तथापि, हा सामना भारतात फक्त स्टार स्पोर्ट्सवर पाहता येणार आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दूसरा सामना तुमच्या मोबाईल फोनवर देखील पाहू शकणार नाहीत. तुम्हाला जिओ हॉटस्टार अॅप डाउनलोड करावे लागणार असून तुमच्या मोबाईल नंबरने लॉग इन करावे लागणार आहे. तसेच यानंतर तुम्ही हा सामना तुमच्या फोनवर देखील सहजपणे पाहू शकता. तुमच्या फोन व्यतिरिक्त, तुम्ही जिओ हॉटस्टार वेबसाइटवर देखील हा सामना पाहू शकता.
हेही वाचा : IND vs AUS: ‘त्यांच्यासारखे लोक खूप कमी…’, कसोटी कर्णधार शुभमन गिलचे ‘या’ दोन माजी कर्णधारांवर भाष्य
भारत : शुभमन गिल (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, देवदत्त पडिकल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नारायण जगदीसन (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्ण
वेस्ट इंडिज: रोस्टन चेस (कर्णधार), जोमेल वॉरिकन (उपकर्णधार), केव्हलॉन अँडरसन, अॅलिक अथानासे, जॉन कॅम्पबेल, टागनारिन चंद्रपॉल, जस्टिन ग्रीव्हज, शाई होप, टेविन इमलाच, जेदेदिया ब्लेड्स, जोहान लायन, ब्रँडन किंग, अँडरसन फिलिप, खॅरी पियरे, जेडेन सील्स






