Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी BCCI ने उघडली तिजोरी! ICC पेक्षा जास्त बक्षीस रक्कम केली जाहीर

बीसीसीआयने आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 03, 2025 | 02:33 PM
फोटो सौजन्य - बीसीसीआय

फोटो सौजन्य - बीसीसीआय

Follow Us
Close
Follow Us:

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी, २ नोव्हेंबर रोजी रात्री आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक २०२५ च्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला हरवून चमकदार ट्रॉफी जिंकली. जेतेपदाच्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. टीम इंडियाच्या विजयामुळे मोठा नफा झाला. आयसीसीने विश्वचषक विजेत्या संघासाठी ४.४८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची बक्षीस रक्कम निश्चित केली होती, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ३९.७८ कोटी रुपये इतकी आहे. 

आता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आयसीसीपेक्षा जास्त बक्षीस रक्कम जाहीर केली आहे. बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघासाठी ५१ कोटी रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे.

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड

एएनआयशी बोलताना देवजित सैकिया म्हणाले, “१९८३ मध्ये कपिल देव यांनी भारताला विश्वचषक जिंकून देऊन क्रिकेटमध्ये एका नवीन युगाची आणि प्रेरणाची सुरुवात केली. आज महिलांनीही तोच उत्साह आणि प्रेरणा आणली आहे. हरमनप्रीत कौर आणि तिच्या संघाने आज केवळ ट्रॉफी जिंकली नाही तर सर्व भारतीयांची मने जिंकली आहेत. त्यांनी महिला क्रिकेटपटूंच्या पुढच्या पिढीसाठी मार्ग मोकळा केला आहे… आमच्या संघाने सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले तेव्हा महिला क्रिकेट आधीच पुढच्या पातळीवर पोहोचले होते…”

BCCI Secretary Devajit Saikia announces ₹51 Crore cash reward for the Indian Women’s cricket team after it won the ICC Women’s World Cup https://t.co/NkU9VOC3jB — ANI (@ANI) November 2, 2025

ते पुढे म्हणाले, “जय शाह यांनी बीसीसीआयचा कार्यभार स्वीकारल्यापासून (२०१९ ते २०२४ पर्यंत बीसीसीआय सचिव म्हणून काम केले), त्यांनी महिला क्रिकेटमध्ये अनेक बदल घडवून आणले आहेत. वेतन समतेवरही लक्ष केंद्रित करण्यात आले. गेल्या महिन्यात आयसीसी अध्यक्ष जय शाह यांनी महिलांच्या बक्षीस रकमेत ३०० टक्के वाढ केली. बक्षीस रक्कम पूर्वी २.८८ दशलक्ष डॉलर्स होती, आता ती १४ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढवण्यात आली आहे. 

IND W vs SA W : भारताविरुद्ध विश्वचषक फायनलचा सामना गमावला पण मनं जिंकली… पराभवानंतर केलं लॉरा वोल्वार्डने भावूक विधान!

या सर्व पावलांमुळे महिला क्रिकेटला मोठी चालना मिळाली आहे. बीसीसीआयने संपूर्ण संघासाठी – खेळाडू, प्रशिक्षकांसाठी ५१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. आम्ही संघ आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करत आहोत,” असे ते म्हणाले. भारताच्या संघाने फायनलमध्ये कमालीची सुरुवात केली आणि फायनलमध्ये भारतीय संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तेव्हा संघाची फिरकी गोलंदाज दिप्ती शर्मा हिने पाच विकेट्स घेऊन संघासाठी दमदार कामगिरी केली इतिहासात नाव कोरले आहे. 

Web Title: Bcci opens coffers for indian women world cup winning team announces more prize money than icc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2025 | 01:54 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • Laura Wolvaardt
  • Sports
  • Video Viral
  • Women's World Cup

संबंधित बातम्या

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!
1

Photo : दीप्ती शर्माने असे केले जे आजपर्यंत केवळ महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरुष क्रिकेटमध्येही घडले नाही!

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…
2

Harmanpreet Kaur Net Worth : विश्वविजेती कर्णधार हरमनप्रीत कौर करोडोंची मालिकीण! लग्जरी कार-आलिशान बंगला…

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड
3

Team India Victory Parade : भारतीय महिला संघ मुंबईत साजरा करणार का विक्ट्री परेड? BCCI सचिवांनी योजना झाली उघड

IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय
4

IND W vs SA W : 308 धावा, 1 शतक आणि अर्धशतक… विश्वचषकाचा तो सामना ठरला खलनायक! प्रतीकाने व्हीलचेअरवर बसून साजरा केला विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.