फोटो सौजन्य - BCCI
BCCI to give Rs 58 crore to Champions Trophy winning team : न्यूझीलंडला हरवून नुकतेच चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकणाऱ्या भारतीय संघासाठी बीसीसीआयने तिजोरी उघडली आहे, जिथे त्यांनी संपूर्ण संघाला ५८ कोटी रुपयांची मोठी रक्कम बक्षीस म्हणून दिली आहे. ही रक्कम संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफ तसेच अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या सदस्यांमध्ये वाटली जाणार आहे. याअंतर्गत, प्रत्येक खेळाडू आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना ३ कोटी रुपये मिळणार आहेत, तर प्रशिक्षक स्टाफमधील प्रत्येक सदस्याला प्रत्येकी ५० लाख रुपये दिले जाणार आहेत.
RCB vs KKR : कधी आणि कुठे पाहता येणार IPL 2025 चा पहिला सामना, वाचा Live Streaming ची संपूर्ण माहिती
बीसीसीआयचे सचिव सैकिया यांनी विजेत्या भारतीय संघाला देण्यात येणाऱ्या ५८ कोटी रुपयांच्या रोख बक्षीसाची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ३ कोटी रुपये मिळतील, तर मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरलाही तेवढीच रक्कम मिळेल.’ याशिवाय, इतर प्रशिक्षकांना ५०-५० मिळतील, ज्यामध्ये सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशेत, अभिषेक नायर, फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक आणि गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांचा समावेश आहे. याशिवाय, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना प्रत्येकी २५ लाख रुपये दिले जाणार आहेत.
९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर चार विकेट्सनी रोमांचक विजय मिळवून भारताने हे प्रतिष्ठित विजेतेपद पटकावले. बक्षीस रकमेची घोषणा केल्यानंतर बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले, ‘लागू दोन आयसीसी विजेतेपदे जिंकणे विशेष आहे आणि ही बक्षीस रक्कम संघाच्या समर्पणाची ओळख पटवते.’ रोख पारितोषिक म्हणजे पडद्यामागे प्रत्येकाने केलेल्या कठोर परिश्रमाची पावती आहे. २०२५ मध्ये आयसीसी अंडर-१९ महिला विश्वचषक जिंकल्यानंतर ही आमची दुसरी आयसीसी ट्रॉफी होती आणि ती आमच्या देशात असलेल्या मजबूत क्रिकेट पायाभूत सुविधा दर्शवते.”
THE BREAK-DOWN OF 58 CRORES OF CHAMPIONS TROPHY VICTORY. [Gaurav Gupta from TOI] Players – 3 Crores each.
Head Coach – 3 Crores each.
Support Staffs – 50 Lakhs each. pic.twitter.com/4m9mocji5t — Johns. (@CricCrazyJohns) March 20, 2025
विजेतेपद जिंकल्याबद्दल भारताला २.२४ दशलक्ष डॉलर्स (सुमारे २० कोटी रुपये) रोख बक्षीस मिळाले. तर स्पर्धेतील उपविजेत्या न्यूझीलंडला १.२ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ९.७२ कोटी रुपये) मिळाले. याशिवाय, उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेला $५६०,००० (४.८६ कोटी रुपये) मिळाले.
आता सर्व खेळाडू आयपीएल २०२५ च्या नव्या सीझनमध्ये पाहायला मिळणार आहेत. यासाठी सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. आता नव्या सीझनमध्ये संघ कशाप्रकारे कामगिरी करेल याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे.