फोटो सौजन्य - KolkataKnightRiders सोशल मीडिया
First match of IPL 2025 : इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला सामना सुरु व्हायला काही तास शिल्लकर राहिले आहेत. त्यामुळे आता चाहत्यांचा आनंद शिगेला पोहोचला आहे. सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात कोण आयपीएल २०२५ ची विजयी सुरुवात करणार याकडे चाहत्यांचे लक्ष्य लागले आहे. पहिल्याच सामान्यच भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली खेळताना दिसणार आहे, त्यामुळे सर्वच क्रिकेट चाहते प्रचंड उत्सुक आहेत. शनिवारपासून म्हणजेच २२ मार्चपासून आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्याने होईल.
IPL 2025 च्या उद्घाटन सोहळ्यात रंगणार बॉलिवूडची मेहफिल, कलाकारांची यादी आली समोर
आरसीबी विरुद्ध केकेआर सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. आयपीएलची सुरुवात २००८ मध्ये झाली होती. आयपीएलला क्रिकेटचा उत्सव असेही म्हणतात. भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी आयपीएल हा एखाद्या सणापेक्षा कमी नाही. हा संपूर्ण भारतात आणि संपूर्ण जगात साजरा केला जातो. मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच ही स्पर्धा पाहायला आवडते. आयपीएल २ महिने चाहत्यांचे मनोरंजन करते. आज आम्ही तुम्हाला या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग कधी आणि कुठे पाहता येणार आहे यासंदर्भात सविस्तर माहिती देणार आहेत.
इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये रंगणार आहे. आयपीएल २०२५ चा पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. टेलिव्हिजनवर पाहणारे प्रेक्षक या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात तर या सामन्याची लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर पाहता येणार आहे. आयपीएल २०२५ चे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओहॉटस्टार अॅप आणि त्यांच्या वेबसाइटवर मोफत असणार नाही. त्यासाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन घ्यावे लागेल. तथापि, याआधी, चाहत्यांनी सलग दोन वर्षे जिओ सिनेमावर मोफत आयपीएलचा आनंद घेतला आहे पण यावेळी ते होणार नाही.
New season, same hunger ⚔️
We’re all geared up for our first encounter of TATA IPL 2025. pic.twitter.com/nvYYuZMLy3
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 21, 2025
आयपीएल २०२५ च्या ज्या संघांच्या कर्णधारांची नावे उघड झाली आहेत त्यात केकेआर अजिंक्य रहाणे, एसआरएच पॅट कमिन्स, पंजाब श्रेयस अय्यर, मुंबई इंडियन्स हार्दिक पंड्या , एलएसजी ऋषभ पंत , गुजरात टायटन्स शुभमन गिल , राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन, आरसीबी रजत पाटीदार आणि चेन्नई सुपर किंग्ज ऋतुराज गायकवाड यांचा समावेश आहे. यामध्ये, आरसीबी, एलएसजी, पंजाब आणि केकेआरने नवीन कर्णधारांची निवड केली आहे.