फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताचा संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियामध्ये सराव करत आहे. टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पहिल्या सामन्यांमध्ये रोहित शर्मा उपस्थित नसल्यामुळे जसप्रीत बुमराहकडे कर्णधार पद सोपवण्यात आले आहे. रोहित शर्मा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे संघामध्ये नसणार आहे. रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या मुलाच्या जन्मासाठी अजूनही मुंबईत आहे. जर रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात खेळला नाही तर केएल राहुलला सलामीवीर म्हणून मैदानात उतरवले जाऊ शकते. पण त्याच दरम्यान एक वाईट बातमी समोर येत आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांची हायप्रोफाईल कसोटी मालिका 22 नोव्हेंबरपासून पर्थ येथे सुरू होणार आहे. पर्थ कसोटीपूर्वी भारतीय संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक स्टार फलंदाज जखमी झाला आहे.
क्रीडा संबंधित बातमी वाचण्यासाठी इथे क्लिक करा
शुक्रवारी 15 नोव्हेंबर रोजी पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन मैदानावर तीन दिवसीय सराव सामन्यादरम्यान केएल राहुल जखमी झाला. पर्थमधील वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन मैदानावर भारत आणि भारत-अ यांच्यात तीन दिवसीय सराव सामना खेळला जात आहे. वेस्टर्न ऑस्ट्रेलियन क्रिकेट असोसिएशन मैदानावर बाऊन्स घेत असलेला चेंडू केएल राहुलच्या उजव्या कोपरावर आदळला. चेंडू लागल्यानंतर केएल राहुलला वेदना होत होत्या. वेदनेने त्रासलेल्या केएल राहुलला फलंदाजी करणे शक्य नव्हते, त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले.
पण आता केएल राहुल आता पूर्णपणे बरा आहे असे वृत्त समोर आले आहेत. त्यामुळे त्याला संघामध्ये प्लेइंग ११ मध्ये जागा मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. कसोटी सामन्यांमध्ये, केएल राहुलने शेवटच्या 5 डावात 16, 22*, 68, 0 आणि 12 धावा केल्या आहेत. केएल राहुलने आतापर्यंत 53 कसोटी सामन्यांच्या 91 डावांमध्ये भारतासाठी 2981 धावा केल्या आहेत. केएल राहुलने या कालावधीत 8 शतके आणि 15 अर्धशतके केली आहेत. केएल राहुलचा कसोटीतील सर्वोत्तम धावसंख्या १९९ धावा आहे.
KL Rahul was taken off the field as part of Precaution – he will be completely fit for the first Test in BGT. ⚡ pic.twitter.com/J0rMgQCgKc
— Johns. (@CricCrazyJohns) November 15, 2024
रोहित शर्मा आणि केएल राहुल हे दोघेही फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळू शकले नाहीत, तर ध्रुव जुरेलसारख्या युवा फलंदाजाला संधी देणे भारतीय संघासाठी खूप फायदेशीर ठरेल.
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जैसवाल मोहम्मद सिराज, आकाशदीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
राखीव : मुकेश कुमार, नवदीप सैनी, खलील अहमद.