फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
मोहम्मद शामीची आयसीसीकडे मागणी : टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये स्थान पक्के केले आहे. यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शामीने भारतीय संघामध्ये बऱ्याच महिन्यांनी संघामध्ये पुनरागमन केले आहे, पण सध्या तो त्याच्या लयीमध्ये येण्यासाठी वेळ घेत आहे. त्याने चॅम्पियन ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात बांग्लादेशविरुद्ध ५ विकेट्स घेतले पण पाकिस्तानविरुद्ध त्याला गोलंदाजी करण्यात अडचणी आल्या. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट्स घेतले आणि संघाला अडचणीतून काढले. आता मोहम्मद शमीने चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यापूर्वी आयसीसीला एक खास विनंती केली आहे.
कॅप्टन Rohit Sharma ने रचला विश्वविक्रम, असा चमत्कार जो जगभरात कोणत्या कर्णधाराने केला नाही
शामीने चेंडूवर लाळ वापरण्याची पुन्हा परवानगी मिळावी यासाठी आयसीसीकडे अपील केले. आयसीसीने आधीच चेंडूवर थुंकण्यावर बंदी घातली आहे, ज्यामुळे वेगवान गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग होण्यास मदत होते, परंतु आता गोलंदाज त्याचा वापर करू शकत नाहीत, ज्यामुळे त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
खरं तर, २०२० मध्ये कोरोना साथीनंतर, आयसीसीने चेंडू चमकवण्यासाठी लाळेच्या वापरावर बंदी घातली होती. तथापि, घामाने चेंडू चमकवण्याची परवानगी होती. चेंडूवर थुंकल्याने संसर्ग पसरण्याचा धोका वाढू शकतो, म्हणून २०२० च्या कोरोना साथीच्या काळात हा निर्णय लागू करण्यात आला. यानंतर, सप्टेंबर २०२२ मध्ये, चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर कायमचा बंदी घालण्यात आली. आयसीसीच्या आचारसंहिता ४१.३ मध्ये सुधारणा केल्याने, चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय सामन्यादरम्यान चेंडू चमकवण्यासाठी खेळाडूने लाळेचा वापर केल्यास आता तो बॉल टॅम्परिंग म्हणून गणला जाईल.
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने अलीकडेच आयसीसीला चेंडूवर लाळ लावण्याचा नियम परत आणण्याची विनंती केली. शमी म्हणाला की आम्ही रिव्हर्स स्विंगसाठी प्रयत्न करत आहोत, पण आम्हाला चेंडूवर थुंकण्याची परवानगी नाही. आम्ही सतत आवाहन करत आहोत की चेंडूवर लाळ वापरण्यास परवानगी द्यावी जेणेकरून चेंडू कडक आणि चमकदार होण्यास तसेच रिव्हर्स स्विंगमध्ये मदत होईल.
शमी पुढे म्हणाला, “मी माझी लय परत मिळवण्याचा आणि संघात अधिक योगदान देण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा दोन वेगवान गोलंदाज नसतात तेव्हा ही एक जबाबदारी असते आणि मला अधिक जबाबदारी घ्यावी लागते. जेव्हा तुम्ही एक प्रमुख वेगवान गोलंदाज असता आणि दुसरा अष्टपैलू असतो तेव्हा एकावर दबाव असतो. तुम्हाला विकेट घ्याव्या लागतात आणि आघाडीवरून नेतृत्व करावे लागते.”