फोटो सौजन्य - Sport Nation NZ सोशल मीडिया
Kane Williamson Press Conference : चॅम्पियन ट्रॉफी २०२५ मध्ये फायनलमध्ये खेळणारे दोन संघ जगाला मिळाले आहेत. न्यूझीलंडच्या संघाने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून फायनल गाठली, तर भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड आणखी एकदा दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने असणार आहेत. लीग सामन्यांमध्ये भारताच्या संघाने न्यूझीलंडचा पराभव केला होता त्यामुळे आता किवी संघ बदला घेण्याच्या उद्देशानेच मैदानामध्ये उतरेल. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात ९ मार्च रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाईल.
५ मार्च रोजी दुसऱ्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला. आता भारत आणि न्यूझीलंडचे संघ दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत, याआधी टीम इंडियाने शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडला पराभूत केले होते. दरम्यान, अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा माजी कर्णधार केन विल्यमसनने सांगितले की यावेळी भारताविरुद्ध किवी संघाची रणनीती काय असेल?
अंतिम सामन्यापूर्वी न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विल्यमसन म्हणाला की, टीम इंडिया खरोखरच चांगले खेळत आहे. त्यामुळे, गेल्या सामन्यातून काहीतरी शिकणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. अंतिम सामन्यात काहीही होऊ शकते. गेल्या सामन्यातील वातावरण खूप छान होते आणि मला खात्री आहे की ते पुन्हा चांगले होईल. चला काही सकारात्मक बाबी घेऊया आणि अंतिम फेरीपर्यंत आपण कसे चांगले करता येईल त्याचा प्रयत्न करत आहोत.”
उपांत्य फेरीच्या सामन्यात, रचिन रवींद्रने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार फलंदाजी केली आणि शतक झळकावले. या सामन्यात रचिनने केन विल्यमसनसोबत चांगली भागीदारी केली. रचिन रवींद्र यांचे कौतुक करताना विल्यमसन म्हणाला, “रचिनने त्याचे पाचही एकदिवसीय शतके फक्त आयसीसी स्पर्धांमध्येच झळकावली आहेत. त्याच्यासोबत फलंदाजी करणे नेहमीच छान असते. “तो मैदानावर उतरताच संघाला प्राधान्य देतो.”
Even Kane Williamson couldn’t quite believe his semi-final ton was his third-straight ODI century against South Africa 😆
The @BLACKCAPS great becomes the first NZ player to achieve the unique milestone.
READ 👉 https://t.co/giuIePRavF I #ChampionsTrophy pic.twitter.com/sbsjC7j6aW
— Sport Nation NZ (@SportNationNZ) March 5, 2025
केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र या दोघांनीही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतके झळकावली. या सामन्यात रॅचिनने १०८ धावा आणि विल्यमसनने १०२ धावा केल्या. दोघांमध्ये १६४ धावांची भागीदारी झाली. ज्यामुळे न्यूझीलंडला ३५० पेक्षा जास्त धावा करण्यात खूप मदत मिळाली. रचिन रवींद्रला त्याच्या शानदार कामगिरीसाठी सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले.