
फोटो सौजन्य - Social Media
आयपीएल २०२६ च्या पार्श्वभूमीवर Budweiser 0.0 ने Mumbai Indians सोबत भागीदारीची घोषणा करत भारतीय क्रिकेटमध्ये मोठी एंट्री केली आहे. या सहकार्याच्या माध्यमातून ब्रँडने पहिल्यांदाच आयपीएलच्या १९व्या हंगामात सहभाग नोंदवला असून, चाहत्यांशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न केला आहे.
क्रिकेट हा भारतातील सर्वात प्रभावी सांस्कृतिक दुवा मानला जातो. त्यामुळे आयपीएलसारख्या भव्य मंचावरून चाहत्यांशी संवाद साधण्याची ही एक मोठी संधी असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. विविध शहरांमध्ये होणाऱ्या सामन्यांच्या माध्यमातून बडवायझर ०.० चाहत्यांपर्यंत पोहोचणार असून, त्यांच्या भावनांशी नाळ जुळवण्यावर भर दिला जाणार आहे.
एबी इनबेव इंडियाचे व्हाइस प्रेसिडेंट विनीत शर्मा यांनी सांगितले की, क्रिकेटमधील चाहत्यांची उत्कटता आणि ऊर्जा हीच ब्रँडसाठी प्रेरणादायी आहे. “आम्ही स्वतःला संस्कृतीच्या अग्रभागी ठेवत, फॅन एक्सप्रेशनला नवे ट्रेंड देण्यावर भर देतो. आयपीएलमध्ये प्रवेश हा आमच्यासाठी महत्त्वाचा टप्पा असून, राष्ट्रीय फॅन्डमपासून शहरनिहाय फॅन्डमकडे जाण्याचा आमचा हा प्रवास आहे,” असे ते म्हणाले. दरम्यान, मुंबई इंडियन्सच्या प्रवक्त्यांनीही या भागीदारीबाबत उत्साह व्यक्त केला. “आमच्यासाठी चाहते हे केंद्रस्थानी आहेत. बडवायझर ०.० सोबतची भागीदारी #OneFamily या आमच्या संकल्पनेशी सुसंगत आहे. एकत्र येऊन आम्ही चाहत्यांसाठी अधिक आकर्षक आणि संस्मरणीय अनुभव तयार करू,” असे त्यांनी नमूद केले.
ही भागीदारी ‘इन द हँड्स ऑफ फॅन्स’ या कॅम्पेनवर आधारित आहे. या मोहिमेद्वारे राष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटप्रेमापासून शहरनिहाय निष्ठा आणि टीमशी असलेली बांधिलकी अधोरेखित केली जाणार आहे. विशेष म्हणजे, या सीझनमध्ये बडवायझर ०.० टीम-इन्स्पायर्ड लिमिटेड एडिशन मर्चेंडाइजही सादर करणार आहे, ज्यामुळे चाहत्यांना आपल्या टीमप्रती प्रेम व्यक्त करण्याची नवी संधी मिळणार आहे. या भागीदारीमुळे बडवायझर ०.० भारतीय क्रिकेटमधील आपली उपस्थिती अधिक बळकट करत असून, फॅन-फर्स्ट अनुभव आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण उपक्रमांद्वारे ब्रँड आपली ओळख अधिक ठसवणार आहे.