Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BWF World Championships : दिल्लीत रंगणार बॅडमिंटनचा महाकुंभ; भारताच्या खेळाडूंची प्रतिष्ठा पणाला

BWF World Championships : 17 ते 23 ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीमध्ये BWF World Championships 2026 रंगणार आहे. आयुष शेट्टीसमोर पहिल्याच फेरीत गतविजेता शी यू चीचे आव्हान असून सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्त्विक-चिरागकडून भारताला पदकाच्या मोठ्या अपेक्षा आहेत.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Aug 10, 2026 | 05:55 PM
फोटो सौजन्य AI

फोटो सौजन्य AI

Follow Us
Follow Us:
  • सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्त्विक-चिरागकडून पदकाची अपेक्षा
  • दिल्लीतील आयोजनावरही विशेष लक्ष
BWF World Championships : भारतात तब्बल 17 वर्षांनंतर बॅडमिंटनच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेचा थरार रंगणार आहे. 17 ते 23 ऑगस्टदरम्यान नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये BWF World Championships 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय खेळाडू सज्ज झाले असून घरच्या मैदानावर पदक मिळवण्याची मोठी संधी त्यांच्यासमोर आहे.

भारतीय युवा खेळाडू आयुष शेट्टी याच्यासाठी मात्र स्पर्धेची सुरुवातच मोठ्या आव्हानाने होणार आहे. पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत त्याची लढत चीनचा गतविजेता आणि जागतिक क्रमवारीतील अव्वल खेळाडू शी यू ची याच्याशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे बॅडमिंटनप्रेमींचे विशेष लक्ष लागले आहे.

Commonwealth TT : कॉमनवेल्थ टेबल टेनिसमध्ये पुण्याचा डंका; दोन युवा खेळाडूंची भारताच्या संघात निवड!

आयुषने यापूर्वी 2026 आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावत आपली क्षमता सिद्ध केली आहे. विशेष म्हणजे त्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही त्याला शी यू चीविरुद्धच पराभव स्वीकारावा लागला होता. आता जागतिक अजिंक्यपदाच्या पहिल्याच फेरीत पुन्हा एकदा दोघे आमनेसामने येणार आहेत.

सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्त्विक-चिरागकडून पदकाची अपेक्षा

भारतीय चाहत्यांच्या नजरा केवळ आयुषच्या सामन्यावर नसून पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन आणि सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी-चिराग शेट्टी यांच्यावरही असतील. सिंधूकडून पुन्हा एकदा मोठ्या कामगिरीची अपेक्षा आहे. लक्ष्य सेनदेखील स्पर्धेसाठी विशेष तयारी करत असून भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांचा फायदा मिळण्याची शक्यता आहे.

CWG : मीराबाई चानूंच्या डोळ्यात अश्रू, गळ्यात तिसरे सुवर्ण; मोदी म्हणाले- ‘प्रत्येक अश्रू सोन्यासारखा!’

पुरुष दुहेरीत सात्त्विक आणि चिराग ही भारताची सर्वात मोठी पदकाची आशा मानली जात आहे. जागतिक दर्जाच्या या स्पर्धेत भारताला अनेक विभागांत पदक मिळवण्याची संधी आहे.

दिल्लीतील आयोजनावरही विशेष लक्ष

जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या आयोजनासाठी दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये विविध सुधारणा करण्यात आल्या आहेत. यापूर्वी झालेल्या इंडिया ओपनदरम्यान स्टेडियममधील परिस्थितीबाबत काही तक्रारी झाल्या होत्या. त्यानंतर आयोजकांनी वातानुकूलन, प्रकाशयोजना आणि इतर सुविधांमध्ये सुधारणा केल्याचे सांगितले आहे.

Canadian Open 2026 मध्ये मोठा उलटफेर! अलेक्झांड्रोव्हाचा ‘गेमचेंजर’ विजय; सबालेन्काला नमवत क्वार्टर फायनलमध्ये धडक

17 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा अंतिम सामना 23 ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस भारतीय बॅडमिंटनसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. घरच्या कोर्टवर भारतीय खेळाडू जागतिक स्तरावर किती मोठी कामगिरी करतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Bwf world championships delhi to host badmintons grand spectacle indian players reputation at stake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Badminton
  • PV Sindhu

संबंधित बातम्या

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव
1

Asian Games : क्वार्टर फायनलमध्ये भारतीय महिला बॅडमिंटन संघाला धक्का; ‘या’ संघाकडून मिळाला पराभव

Asian Games : पुरुष बॅडमिंटन संघाने क्वॉर्टर फायनल गाठले; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले
2

Asian Games : पुरुष बॅडमिंटन संघाने क्वॉर्टर फायनल गाठले; तुल्यबळ बांगलादेशला 3-0 ने नमवले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.