Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 9 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Badminton: जगात भारी पुणे! ‘या’ बॅडमिंटन स्पर्धेत सयाजी अन् सोयरा शेलारने जिंकला दुहेरी मुकुट

Badminton: १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सातव्या मानांकित पुण्याच्या ख्याती कत्रेने अठराव्या मानांकित पुण्याच्या कायरा रैनाचा १५-१०, ९-१५, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 09, 2026 | 03:36 PM
Yonex Sunrise SBA Cup

Yonex Sunrise SBA Cup

Follow Us
Follow Us:
  • सयाजी- सोयराला बॅटमिंटनमध्ये दुहेरी मुकुट
  • आदित्य यउल, ख्याती कत्रे, अभिग्यान सिंघा, अनुष्का इप्ते यांचे विजेतेपद
  • कायरा रैनाचा संघर्षपूर्ण विजय
Badminton/Pune: सुधांशु बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि समर्थ ग्रुपच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय १५ व १७ वर्षांखालील बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत पुण्याच्या सयाजी शेलार आणि सोयरा शेलार यांनी दोन गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट पटकावला. एकेरीच्या विविध गटांत नागपूरच्या आदित्य यउल, पुण्याच्या ख्याती कत्रे, पुण्याच्या अभिग्यान सिंघा आणि रायगडच्या अनुष्का इप्ते यांनी विजेतेपदावर नाव कोरले.

पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन कोर्टवर झालेल्या या स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम सामन्यात दहाव्या मानांकित नागपूरच्या आदित्य यउलने रायगडच्या दुसऱ्या मानांकित प्रग्नय शिंदेचा १५-१२, ९-१५, १५-११ असा पराभव करत विजेतेपद पटकावले. आदित्य भवन विद्या मंदिर शाळेत नववीत शिकत असून सीबीई बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक सागर चोपडा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

कायरा रैनाचा संघर्षपूर्ण विजय

१५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत सातव्या मानांकित पुण्याच्या ख्याती कत्रेने अठराव्या मानांकित पुण्याच्या कायरा रैनाचा १५-१०, ९-१५, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. ख्याती वॉलनट स्कूलमध्ये नववीत शिकत असून अजित कुंभार बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीत चौथ्या मानांकित पुण्याच्या अभिग्यान सिंघाने नागपूरच्या पाचव्या मानांकित आदित्य यउलचा १५-८, १५-१३ असा पराभव करून विजेतेपद पटकावले. अभिग्यान बिशप्स स्कूलमध्ये दहावीत शिकत असून ए.वाय. बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक आकाश यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.

 दुहेरीच्या सामन्यांतही रंगतदार लढती

१७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत रायगडच्या अव्वल मानांकित अनुष्का इप्तेने पुण्याच्या दुसऱ्या मानांकित शरयू रांजणेचा १५-६, १४-१६, १५-११ असा पराभव करून विजेतेपद मिळवले. अनुष्का कार्तिका कॉलेजमध्ये अकरावीत शिकत असून नितेश कुमार बॅडमिंटन अकादमीत प्रशिक्षक नितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. दुहेरीच्या सामन्यांतही रंगतदार लढती पाहायला मिळाल्या. १५ वर्षांखालील मिश्र दुहेरीत पुण्याच्या अव्वल मानांकित अर्जुन श्रीगडीवार आणि स्वरा मोरये यांनी पुण्याच्या दुसऱ्या मानांकित स्मीत ठोकळ आणि रावी म्हेत्रे यांचा १५-९, १५-१२ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

अव्वल मानांकितांची दमदार खेळी

१७ वर्षांखालील मिश्र दुहेरीत पुण्याच्या अव्वल मानांकित सयाजी शेलार आणि सोयरा शेलार यांनी पुण्याच्या दुसऱ्या मानांकित राघवेंद्र यादव आणि शर्वरी सुरवसे यांचा १५-८, १५-१० असा पराभव केला. या विजेतेपदामुळे सयाजी आणि सोयरा यांनी स्पर्धेत दुहेरी मुकुटावर आपले नाव कोरले.१५ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत मुंबई शहरच्या दुसऱ्या मानांकित इमान मोटरवाला आणि रुद्र गावडे या जोडीने पुण्याच्या रुद्रनिराजे निंबाळकर आणि नागपूरच्या सान्वी घाटे यांचा १५-८, १५-१० असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

Badminton: मानांकित खेळाडूंना पुण्याच्या लेकींचा दे धक्का! ईशानवी, ध्रुवी अन्…; निकाल वाचून व्हाल थक्क

दुहेरीत हृदान पाडवे, विहान कोल्हाडेंची सरशी

१५ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत पुण्याच्या दुसऱ्या मानांकित हृदान पाडवे आणि विहान कोल्हाडे यांनी ठाण्याच्या मयंक राजपूत आणि रायगडच्या प्रग्नय शिंदे यांचा १३-१५, १५-१०, १५-९ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.१७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत शरयू रांजणे आणि सोयरा शेलार यांनी मनस्वी चौहान आणि थेआ शेठ यांचा १५-१३, १५-११ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.१७ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत पुण्याच्या सयाजी शेलार आणि छत्रपती संभाजीनगरच्या उदयन देशमुख या अव्वल मानांकित जोडीने रायगडच्या मयुरेश भुटकी आणि पुण्याच्या विश्वजीत थविल या दुसऱ्या मानांकित जोडीचा १५-१०, १५-५ असा पराभव करून विजेतेपद मिळवले.

💡

Frequently Asked Questions

  • Que: योनेक्स सनराईज एसबीए कप स्पर्धा पुण्यात कुठे सुरू आहे?

    Ans: योनेक्स सनराईज एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन कोर्टवर पार पडली.

  • Que: नागपूरच्या आदित्य यउलने कोणाचा पराभव केला?

    Ans: आदित्य यउलने रायगडच्या दुसऱ्या मानांकित प्रग्नय शिंदेचा १५-१२, ९-१५, १५-११ असा पराभव केला.

Web Title: Pune yonex sunrise sba badminton cup state level competition sayaji and soyra winners tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • Badminton
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…
1

युवा खेळाडूंसाठी मोठी संधी! Khelo India Youth Games 2026 ची घोषणा; तब्बल 6000 खेळाडू अन्…

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा
2

Maharashtra Open : बॅडमिंटनचा राज्यस्तरीय थरार! १२ नोव्हेंबरपासून बॉम्बे जिमखान्यावर महाराष्ट्र ओपन स्पर्धा

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळच्या शासकीय सदस्यांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांकडून आंदोलनाची हाक
3

Maharashtra Today’s Live Breaking News in Marathi: गोकुळच्या शासकीय सदस्यांच्या निर्णयाविरोधात सतेज पाटलांकडून आंदोलनाची हाक

Relay Race: राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी; रिलेमध्ये चार पदकांसह घवघवीत यश
4

Relay Race: राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत मांढरदेवीच्या खेळाडूंची बाजी; रिलेमध्ये चार पदकांसह घवघवीत यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.