
पुण्याच्या खेळाडूंचा कोर्टवर दबदबा
पी. ई. सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुलींच्या गटात दुसऱ्या फेरीत पुण्याच्या ईशानवी काळेने उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. तिने मुंबई उपनगरच्या पंचविसाव्या मानांकित खनक झालानीचा १५-१२, १५-११ अशा सरळ गेममध्ये पराभव करत स्पर्धेत मोठा उलटफेर घडवून आणला.
Badminton: पुण्यनगरीत रायगडच्या संघाचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत पटकावले ‘हे’ दुहेरी विजेतेपद
इतर सामन्यांत नवव्या मानांकित पुण्याच्या तेजस्वी भुतडाने एकतर्फी लढतीत सोलापूरच्या श्रुतिका बोरगावकरला १५-६, १५-३ असे सहज नमवले. बाराव्या मानांकित मुंबई उपनगरच्या टियान कॅस्टेलिनोने नांदेडच्या आस्था मानेचा १५-६, १५-८ असा पराभव करत तिसरी फेरी गाठली. पुण्याच्याच दोन खेळाडूंमध्ये झालेल्या चुरशीच्या लढतीत निधी गायकवाडने तीन गेमपर्यंत रंगलेल्या सामन्यात ऋषिका रसाळचा १५-११, ९-१५, १५-१० असा पराभव करून आगेकूच केली.
मुलांच्या गटात तिसऱ्या फेरीच्या लढतीत पुण्याच्या सात्विक गुप्ताने जळगावच्या अनमय जोशीचे आव्हान १५-१२, १५-१२ असे मोडीत काढले. नागपूरच्या भाविक मुसळेने पुण्याच्या नील चव्हाणचा १५-८, १५-१२ असा पराभव करत चौथ्या फेरीत प्रवेश मिळवला. तर मुंबई शहरच्या रयान शहाने पुण्याच्या इशान रॉयवर १५-१०, १५-१० अशी मात करत विजय नोंदवला.
Badminton कोर्टवर चुरशीच्या लढती; मुलांमध्ये रायगड, तर मुलींमध्ये…; सेमीफायनलमध्ये कोणाचा प्रवेश?
सुधांशु बॅडमिंटन अकादमीच्या वतीने आणि समर्थ ग्रुपच्या सहकार्याने आयोजित योनेक्स सनराईज एसबीए कप राज्यस्तरीय सब-ज्युनियर आंतरजिल्हा सांघिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत रायगड संघाने मुलांच्या आणि मुलींच्या दोन्ही गटांत विजेतेपद पटकावून दुहेरी कामगिरी नोंदवली. शिवाजीनगर येथील पी. ई. सोसायटी मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या बॅडमिंटन कोर्टवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील १७ वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात रायगडने बुलढाणा संघाचा २-१ असा पराभव केला. रायगडच्या कृत्य पटेलने एकेरीच्या सामन्यात बुलढाण्याच्या देवव्रत खांडेकरचा १५-५, १५-६ असा सहज पराभव करत संघाला आघाडी मिळवून दिली.
Ans: ‘योनेक्स सनराईज एसबीए कप बॅडमिंटन स्पर्धा पी. ई. सोसायटीच्या मॉडर्न पीडीएमबीए स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सुरू आहे.
Ans: ईशानवी काळे, तेजस्वी भुतडा, निधी गायकवाड, सात्विक गुप्ता, स्वरा मोरे आणि आरोही एन पुढील फेरीत प्रवेश केला आहे.