
IND Vs NZ t20
भारतीय क्रिकेट संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर असून आज सिरीजमधला दुसरा टी २० सामना खेळवला जाणार आहे. टीम इंडियाने अहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह भारताने सिरीजमध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात कर्णधार श्रेयस अय्यरकडे भारताचा माजी यशस्वी कर्णधार रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडीत काढण्याची सुवर्णसंधी असणार आहे. श्रेयस अय्यरला कर्णधारपद मिळाल्यानंतर सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये त्याची कामगिरी म्हणावी तशी दिसून आली नव्हती. मात्र सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसून येत आहे. श्रेयस अय्यरकडे आता भारतीय टी-20 संघाचा कर्णधार म्हणून एकाच कॅलेंडर वर्षात सर्वाधिक रन्स करण्याचा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.
सध्या हा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे, ज्याने कर्णधार म्हणून एका वर्षात सर्वाधिक टी-20 मध्ये रन्स केल्या आहेत. श्रेयस अय्यरने या मालिकेत आपली फलंदाजीची हीच लय कायम ठेवल्यास तो रोहित शर्माचा हा विक्रम मागे टाकून नवा रेकॉर्ड करू शकतो. कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून श्रेयस अय्यरने आतापर्यंत २२ आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत. या सामन्यांमध्ये त्याने एकूण ६३२ रन्स केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि २ अर्धशतकी खेळीचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या आजच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयस अय्यरने जर २५ किंवा त्यापेक्षा जास्त रन्स केल्यास तो एका कॅलेंडर वर्षात भारतीय T20I कर्णधार म्हणून सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज ठरणार आहे.
Ans: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी २० सामना भारतीय वेळेनुसार १२.३० वाजता सुरू होणार आहे..
Ans: पहिल्या टी २० सामन्यात न्यूझीलंडवर भारताने सहज विजय प्राप्त केला.