Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: अभिषेक-सॅमसनची जोडी एकदम कडक! न्यूझीलंडच्या मैदानात घातला धुमाकूळ, रोहित-राहुलचा विक्रम स्वाहा

Abhishek Sharma and Sanju Samson Broke Opening Record: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने शानदार कामगिरी केली. त्यांनी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांचा मोठा विक्रम मोडला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 22, 2026 | 08:54 PM
photo- social media

photo- social media

Follow Us
Follow Us:
  • अभिषेक-सॅमसनचा न्यूझीलंडमध्ये धमाका
  • रोहित-राहुलचा ६ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
  • भारताची सर्वोत्तम सलामीची भागीदारी
Abhishek Sharma and Sanju Samson : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामना आज खेळला गेला. या सामन्यात भारताने दणदणीत विजय नोंदवला. क्राइस्टचर्च येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या किवी फलंदाजांनी ४ विकेट्स गमावून २२५ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने १९.४ षटकांत सहा विकेट्स गमावून २२६ धावांचे लक्ष्य पूर्ण केले.

पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने दिमाखात विजय मिळवला. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाला जलद सुरुवातीची गरज होती.सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी आपल्या आक्रमक फलंदाजीने ही उणीव भरून काढली. या दोन फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर दबाव आणत अवघ्या ३५ चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी ९३ धावा जोडल्या. या स्फोटक भागीदारीने भारतीय क्रिकेटमधील एक मोठा विक्रम धुळीस मिळवला.

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

अभिषेक-सॅमसनने रोहित-राहुलच्या जोडीला टाकले मागे

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी सुरुवातीपासूनच जलद धावा करण्यावर लक्ष केंद्रित केले. या जोडीने मैदानाच्या सर्व बाजूंनी फटकेबाजी करत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली. दोघांच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने चौथ्या षटकातच ५० धावा पूर्ण केल्या. यानंतरही या जोडीने आपला हल्ला सुरूच ठेवला आणि पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. या कामगिरीमुळे अभिषेक आणि सॅमसन यांनी टी२० सामन्यात न्यूझीलंडच्या भूमीवर, भारताच्या सर्वोच्च सलामीच्या भागीदारीचा विक्रम प्रस्थापित केला.

यापूर्वी हा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या नावावर होता. त्यांनी २०२० मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या एका टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिल्या विकेटसाठी ८९ धावा जोडल्या होत्या. अभिषेक आणि सॅमसन यांनी आपल्या स्फोटक फलंदाजीने जवळपास सहा वर्षे टिकून असलेला हा विक्रम मोडला. न्यूझीलंडच्या मायदेशात त्यांच्याविरुद्ध भारतीय सलामीच्या जोडीने केलेल्या सर्वोत्तम कामगिरींपैकी ही एक भागीदारी आहे. अभिषेक आणि सॅमसन यांनी मालिकेच्या पहिल्याच सामन्यात आपल्या फलंदाजीने भारतीय संघाला केवळ एक मजबूत सुरुवात करून दिली नाही, तर इतिहासही रचला.

मायदेशात न्यूझीलंडविरुद्धची सर्वोच्च सलामीची भागीदारी

  • अ‍ॅलेक्स हेल्स आणि मायकल लंब (इंग्लंड) – १४३ धावा (२०१३)
  • अ‍ॅलेक्स हेल्स आणि पथुम निस्संका (श्रीलंका) – १२१ धावा (२०२३)
  • डेव्हिड वॉर्नर आणि डार्सी शॉर्ट (ऑस्ट्रेलिया) – १२१ धावा (२०१८)
  • फखर जमान आणि अहमद शहजाद (पाकिस्तान) – ९४ धावा (२०१८)
  • संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा (भारत) -९३ धावा (२०२६)
IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

Web Title: Abhishek sharma sanju samson breaks rohit rahul new zealand opening record pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Abhishek Sharma
  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Sanju Samson

संबंधित बातम्या

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…
1

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री
2

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी
3

IND Vs NZ: नमनचा ‘धीर’ न्यूझीलंडसाठी ठरला घातक; अटीतटीच्या लढतीत टीम India ने मारली बाजी

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान
4

IND vs NZ 1st T20 Live: ग्लेन फिलिप्सची वादळी खेळी; किवींनी भारतीय गोलंदाजांना रडवलं, टीम इंडियासमोर 226 धावांचं आव्हान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.