Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs NZ: पहिल्या सामन्यात भारताची बाजी! आता न्यूझीलंड घेणार पराभवाचा बदला? दुसरा टी-२० सामना कधी अन् कुठे?

IND vs NZ 2nd T20 Schedule: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी२० मालिकेतील पहिला सामना गुरुवारी खेळला गेला. आता, दुसरा सामना कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 23, 2026 | 02:11 PM
Photo- Social media

Photo- Social media

Follow Us
Follow Us:
  • दुसऱ्या टी-२०चा थरार कधी रंगणार?
  • कधी अन केव्हा भिडणार?
  • जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट
IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेलची धडाकेबाज सुरुवात झाली आहे. मालिकेतील पहिला सामना गुरुवार, २२ ऑक्टोबर रोजी खेळला गेला. हा सामना क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हल मैदानावर रंगला. या मोठ्या धावसंख्येच्या सामन्यात, टीम इंडियाने हा न्यूझीलंडला ४ विकेट्सने हरवले. ऑलराउंडर नमन धीरने उत्कृष्ट कामगिरी करत भारताला दणदणीत विजय मिळवून दिला. या विजयासह, भारताने पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. आता दुसरा टी-२० सामना कधी, कुठे आणि केव्हा खेळला जाईल, जाणून घेऊयात. (IND vs NZ 2nd T20 Schedule)

IND vs NZ: अभिषेक-सॅमसनची जोडी एकदम कडक! न्यूझीलंडच्या मैदानात घातला धुमाकूळ, रोहित-राहुलचा विक्रम स्वाहा

भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी२० सामना कधी होणार?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाईल. दुसरा टी२० सामना देखील क्राइस्टचर्चमधील हॅगली ओव्हलवर खेळला जाईल. पहिला सामना देखील याच मैदानावर खेळण्यात आला होता. त्यामुळे, दोन्ही संघांना खेळपट्टीच्या परिस्थितीची अंदाज असणार आहे. पहिला सामना गमावल्यानंतर, न्यूझीलंड संघ दुसरा सामना जिंकून मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.

या मैदानावर नाणेफेक जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पहिल्या टी२० सामन्यात, टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.परंतु, न्यूझीलंडने देखील प्रथम फलंदाजी करत धावांचा वर्षाव केला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यात देखील मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्याता आहे.

सामना किती वाजता सुरू होईल?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल. त्यापूर्वी अर्धा तास आधी १२ वाजता दोन्ही कर्णधार नाणेफेकीसाठी मैदानात उतरतील.

हा सामना कुठे पाहू शकता?

दुसरा टी२० आंतरराष्ट्रीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनल्सवर थेट पाहता येईल. हा सामना अधिकृत चॅनल डीडी स्पोर्ट्सवरही प्रसारित केला जाईल. तिथे तुम्ही हा सामना विनामूल्य पाहू शकता.

भारताचा संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन, तिलक वर्मा, अक्षर पटेल, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, नमन धीर, प्रिन्स यादव, मयंक यादव, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, वरुणदीप चक्रवर्ती, कुलदीप यादव.

न्यूझीलंड संघ

फिन ऍलन, टिम सेफर्ट (विकेटकीपर), डेव्हॉन कॉनवे, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिचेल, मायकल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (कर्णधार), नॅथन स्मिथ, काइल जेमिसन, मॅट हेन्री, लॉकी फर्ग्युसन, जोश क्लार्कसन, जेकब डफी, बेव्हॉन जेकब्स, ऍडम मिल्ने, ब्लेअर टिकनर.

IND vs NZ: अर्शदीप सिंगने पूर्ण केलं ‘शतक’; मैदानात उतरताच रचला इतिहास, विराट-रोहितच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा टी-२० सामना कधी ?

    Ans: दुसरा टी-२० सामना शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे.

  • Que: भारत विरुद्ध न्यूझीलंड दुसरा टी-२० सामना कुठे होणार?

    Ans: हा सामना न्यूझीलंडमधील क्राइस्टचर्च येथील हॅगली ओव्हल मैदानावर खेळला जाणार आहे.

  • Que: दुसरा टी-२० सामना किती वाजता सुरू होईल?

    Ans: दुसरा टी-२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १२:३० वाजता सुरू होईल.

Web Title: Ind vs nz 2nd t20 schedule date time live telecast where to watch pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 02:08 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • Mitchell Santner
  • Shreyas Iyer
  • T20 series

संबंधित बातम्या

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा
1

India A Squad: भारताच्या A संघात BCCI चा मोठा बदल! 21 वर्षाच्या शिखर मोहनला मिळाली जागा

Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य
2

Vaibhav Sooryavanshi: ईशान किशनला दुखापत, दुसऱ्या T20 मध्ये वैभव सूर्यवंशीची वर्णी लागण्याची शक्यता! कोचचे मोठे वक्तव्य

IND vs NZ: अभिषेक-सॅमसनची जोडी एकदम कडक! न्यूझीलंडच्या मैदानात घातला धुमाकूळ, रोहित-राहुलचा विक्रम स्वाहा
3

IND vs NZ: अभिषेक-सॅमसनची जोडी एकदम कडक! न्यूझीलंडच्या मैदानात घातला धुमाकूळ, रोहित-राहुलचा विक्रम स्वाहा

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…
4

IND Vs NZ: इतका मोठा फ्लॉप शो! सर्वांनी दिल्या 40 पेक्षा जास्त रन्स, भुवीने इतिहासात पहिल्यांदाच…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.