फोटो सौजन्य - Crictacker सोशल मीडिया
चॅम्पियन ट्रॉफी २०२५ : आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी १९ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणार आहे. या मेगा स्पर्धेत एकूण ८ संघ सहभागी होणार आहेत. या संघाचे दोन गटामध्ये विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या ग्रुपमध्ये भारत, बांग्लादेश, न्यूझीलंड आणि पाकिस्तानचा संघ आहे तर दुसऱ्या ग्रुपमध्ये दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया हे संघ आहेत. क्रिकेट चाहत्यांसाठी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदी कमेंट्री पॅनलची घोषणा करण्यात आली आहे, ज्यामध्ये सुरेश रैना व्यतिरिक्त हरभजन सिंग सारख्या दिग्गजांना संधी मिळाली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदी कमेंट्री पॅनलमध्ये सुरेश रैना, हरभजन सिंग, वकार युनूस, रॉबिन उथप्पा, मोहम्मद कैफ, अंबाती रायुडू, वहाब रियाज, पियुष चावला, वरुण आरोन, जतिन सप्रू, आकाश चोप्रा, संजय मांजरेकर, संजय बांगर, दीप दासगुप्ता यांना संधी मिळाली आहे. प्रेक्षकांसाठी, नेटवर्कने हिंदी कमेंट्री पॅनलमध्ये अनेक दिग्गजांना स्थान दिले आहे. हे माजी खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्यांच्या उत्कृष्ट समालोचनाने प्रेक्षकांची मने जिंकतील हे निश्चितच आहे. माजी भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त, पाकिस्तानचे दोन माजी दिग्गज वकार युनूस आणि वहाब रियाझ यांनाही संधी मिळाली आहे.
HINDI COMMENTATORS FOR CHAMPIONS TROPHY:
Raina, Harbhajan, Waqar, Uthappa, Kaif, Rayudu, Wahab, Chawla, Aaron, Jatin Sapru, Aakash Chopra, Manjrekar, Bangar, Deep DasGupta. pic.twitter.com/8kHMV1dO56
— Johns. (@CricCrazyJohns) February 18, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केले जाणार आहे. याशिवाय, भारताचे सामने दूरदर्शनवरही मोफत पाहता येणार आहेत. सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग जिओ स्टारवर केले जाईल. प्रेक्षक या मेगा इव्हेंटची आतुरतेने वाट पाहत आहेत. भारतीय वेळेनुसार सामने दुपारी २.३० वाजता सुरु होणार आहेत त्याच्या अर्ध्या तासाआधी म्हणजेच २ वाजता नाणेफेक होईल.
MI vs GG : WPL 2025 मध्ये हरमनप्रीत कौरचा संघ पहिल्या विजयाच्या शोधत, आज कमबॅक करण्याची सुवर्णसंधी
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये, भारतीय संघ २० फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळेल. दुसरा सामना २३ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानविरुद्ध होईल. भारतीय संघाला २ मार्च रोजी न्यूझीलंडविरुद्ध लीग टप्प्यातील शेवटचा सामना खेळायचा आहे. हे सर्व सामने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. विशेष म्हणजे भारतीय संघाने या मैदानावर एकही एकदिवसीय सामना गमावलेला नाही. या मैदानावर भारताचा रेकॉर्ड खूपच प्रभावी आहे.