Champions Trophy 2025 India's Enemy Got Injured in The First Match of Champions Trophy 2025 May be Out of IND vs PAK match
Fakhar Zaman Injury Update : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ची सुरुवात बुधवारपासून पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्याने झाली आहे. पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात पाकिस्तानला मोठा धक्का बसला, संघाचा सलामीवीर फलंदाज फखर झमान क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला.
पाकिस्तानचा स्टार खेळाडू फखार झमान जखमी झाला आहे
The only batter in Pakistan team with Intent, Fakhar Zaman is out of the ground 🤯 pic.twitter.com/8LffbHfhld
— Dinda Academy (@academy_dinda) February 19, 2025
प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या न्यूझीलंड संघाने चांगली सुरुवात केली. पाकिस्तानकडून अबरार अहमदने पहिला बळी घेतला आणि डेव्हॉन कॉन्वेला १० धावांवर बाद केले. केन विल्यमसनही स्वस्तात बाद झाला, नसीम शाहने त्याला १ धावांवर बाद केले.
पहिल्याच षटकात फखार झमान जखमी
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या पहिल्याच षटकात फखर झमान जखमी झाला. सामन्यातील पहिले षटक शाहीन शाह आफ्रिदीने टाकले, या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर विल यंगने मिड-ऑफच्या दिशेने एक शॉट खेळला. हलक्या हातांनी खेळलेल्या या शॉटमध्ये ताकदीचा अभाव होता. गॅपमध्ये जाणारा चेंडू हळूहळू सीमारेषेकडे जात होता, फखर झमान चेंडूच्या मागे धावत असताना घसरला. त्याने एका उत्तम प्रयत्नाने चेंडू थांबवला पण त्या प्रक्रियेत तो जखमी झाला.
फखर झमानच्या दुखापतीबद्दल अपडेट
फखर झमानच्या दुखापतीबाबत पीसीबीने अधिकृत निवेदन जारी केले आहे. ते म्हणाले, “फखर जमानला स्नायूंमध्ये ताण आला आहे. त्यांची तपासणी केली जात आहे आणि योग्य वेळी अधिक माहिती दिली जाईल. फखर झमान न्यूझीलंडविरुद्ध फलंदाजीसाठी येऊ शकतो, तरीही भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात त्याच्या खेळण्यावर शंका असेल. जमान उत्तम फॉर्ममध्ये आहे, त्याच्या दुखापतीमुळे पाक कर्णधार रिझवानच्या अडचणी नक्कीच वाढल्या असत्या.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या
पाकिस्तानचा दुसरा सामना २३ फेब्रुवारी रोजी भारताविरुद्ध आहे. या सामन्यात फखर झमानच्या खेळण्यावर शंका असेल, जर झमान बाहेर पडला तर तो पाकिस्तानसाठी मोठा धक्का असेल. जमानच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने ८५ सामन्यांमध्ये ३६२७ धावा केल्या आहेत. यामध्ये ११ शतके आणि १७ अर्धशतकांचा समावेश आहे. २३ फेब्रुवारी रोजी होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना हा चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताचा दुसरा सामना असेल. भारतीय क्रिकेट संघ गुरुवारपासून (IND vs BAN) चॅम्पियन्स ट्रॉफीला सुरुवात करणार आहे.