फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
रोहित, विराट आणि रवींद्र जडेजा निवृत्ती : भारताच्या संघाने झालेल्या २०२४ मधील विश्वचषक नावावर केला आणि त्यानंतर भारताच्या तीन खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीने मेडल सेरेमनीमध्ये सांगितले की हा त्याचा शेवटचा सामना होता, तर सामना संपल्यानंतर भारताचा कर्णधार रोहित शर्माने देखील T२० मधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्याचबरोबर भारताचा दमदार अष्टपैलू रवींद्र जडेजाने देखील सोशल मीडियावर निवृत्ती जाहीर केली. आता भारताचा संघ चॅम्पियन ट्रॉफी खेळणार आहे, याआधी टीम इंडियाचा माजी खेळाडू आकाश चोप्राने रोहित, विराट आणि रवींद्र जडेजा यांच्यासंदर्भात मोठे वक्तव्य केले आहे, यासंदर्भात सविस्तर वाचा.
माजी भारतीय कसोटी सलामीवीर आकाश चोप्राने रोहित शर्मा , विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांच्याबाबत मोठा दावा केला आहे . २०२५ ची चॅम्पियन्स ट्रॉफी ही विराट, रोहित आणि जडेजासाठी शेवटची आयसीसी स्पर्धा असू शकते असे आकाश चोप्रा मानतात. तो म्हणाला की पुढील आयसीसी स्पर्धा ज्यामध्ये हे तिघेही भाग घेऊ शकतात ती दोन वर्षांनी होईल. तिघेही टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत . अशा परिस्थितीत, १९ फेब्रुवारीपासून सुरू होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ही या तिन्ही दिग्गजांसाठी शेवटची आयसीसी स्पर्धा ठरू शकते.
पाकिस्तान आणि दुबई येथे खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत टीम इंडिया बांगलादेश, पाकिस्तान आणि न्यूझीलंडसह ग्रुप अ मध्ये आहे. टीम इंडियाला या स्पर्धेत पहिला सामना २० फेब्रुवारी रोजी दुबईमध्ये बांगलादेशविरुद्ध खेळायचा आहे. त्याच्या यूट्यूब चॅनलवर, आकाश चोप्रा म्हणाला, “जड अंतःकरणाने मी म्हणतोय की तुम्ही बरोबर आहात. अशी शक्यता आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे आणि त्यानंतर, या वर्षी आणखी एक आयसीसी स्पर्धा होईल, जी WTC (जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा) फायनल आहे आणि आम्ही तिथे पोहोचलो नाही. त्यामुळे विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यापैकी कोणीही त्यात खेळणार नाही.”
या माजी क्रिकेटपटूने पुढे म्हटले की, “त्यानंतर, पुढच्या वर्षीचा आयसीसी कार्यक्रम टी-२० विश्वचषक आहे, परंतु तिघेही त्या फॉरमॅटमधून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे तिघेही तिथे खेळणार नाहीत. एकदिवसीय विश्वचषक २०२७ मध्ये होईल, जो थोडा दूर आहे. २०२७ पर्यंत जग खूप वेगळे दिसेल. मला वाटते की खेळाडूंनाही वाटते की हा त्यांचा शेवटचा आयसीसी कार्यक्रम असू शकतो.” २०२४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम फेरीत विजय मिळवल्यानंतर कोहली, विराट आणि जडेजा यांनी निवृत्तीची घोषणा केली. अशा परिस्थितीत, दोन्ही फॉरमॅटमध्ये खेळणे आणि तंदुरुस्तीचा मुद्दा असणे देखील या खेळाडूंसाठी पुढे खेळण्यात अडथळा ठरू शकते.