फोटो सौजन्य - Chennai Super Kings
काल चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. यंदा चेन्नई सुपर किंग्सच्या संघाची स्थिती अत्यंत बिकट आहे. संघाने या सिझनमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. कालच्या पराभवानंतर चेन्नईचा संघ गुणतालिकेमध्ये सध्या दहाव्या स्थानावर आहे. तर संघाने या सीझनमध्ये आतापर्यत ८ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला आहे. तर ६ सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२५ च्या ३८ व्या सामन्यात, आज वानखेडे स्टेडियमवर मुंबई-चेन्नई (CSK vs MI) संघ पुन्हा एकदा आमनेसामने येत आहेत. CSK विरुद्ध मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
या सामन्यांमध्ये चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड हा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर झाला आहे. त्यामुळे संघाचे कर्णधारपद हे आता महेंद्रसिंह धोनीकडे आहे. २३ मार्च रोजी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या त्यांच्या हंगामाच्या पहिल्या सामन्यात सीएसकेने मुंबई इंडियन्सचा चार विकेट्सने पराभव केला. काल, मुंबई इंडियन्स विरुद्ध, चेन्नई सुपर किंग्सच्या संघासाठी एका आशादायक खेळाडूचे पदार्पण केले आहे. जर आपण त्याच्या फलंदाजी आणि प्रथम श्रेणी क्रिकेटबद्दल बोललो तर त्याची आकडेवारीच त्याची क्षमता दर्शवते.
हरभजन सिंग आणि सुरेश रैना त्यांच्या माजी संघावर संतापले! म्हणाले – CSK ला असं कधीच पाहिलं नव्हतं
आयुष म्हात्रेचा जन्म १६ जुलै २००७ रोजी आर्थिक राजधानी मुंबईत झाला. त्यांचे सध्याचे वय १७ वर्षे २७८ दिवस आहे. महाराष्ट्रातला हा युवा खेळाडू आयुष उजव्या हाताने फलंदाजी करतो आणि उजव्या हाताने ऑफब्रेक गोलंदाजी करतो. तो मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये भाग घेतो. चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या उर्वरित सामन्यांसाठी जखमी कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या जागी १७ वर्षीय फलंदाज आयुष म्हात्रेला करारबद्ध केले आहे. “चेन्नई सुपर किंग्जने जखमी ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुष म्हात्रेला करारबद्ध केले आहे,” असे आयपीएलने जारी केलेल्या एका मीडिया निवेदनात म्हटले आहे. त्याला सीएसकेने ३० लाख रुपयांना करारबद्ध केले आहे. म्हात्रे यांनी मुंबईसाठी नऊ प्रथम श्रेणी सामने आणि सात लिस्ट-ए सामने खेळले आहेत आणि ९६२ धावा केल्या आहेत.
Pulling up at his Mhatre-bhoomi! 💪🏻🦁#MIvCSK #WhistlePodu 🦁💛 pic.twitter.com/HqmkPwNXKs
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) April 20, 2025
नऊ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये, त्याने १६ डावांमध्ये ३१.५० च्या सरासरीने ५०४ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे. त्याचा सर्वोत्तम धावसंख्या १७६ आहे. सात लिस्ट-ए सामन्यांमध्ये त्याने ६५.४२ च्या सरासरीने ४५८ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे, तर त्याचा सर्वोत्तम धावसंख्या १८१ आहे.
भारतासाठी झालेल्या एसीसी अंडर-१९ आशिया कपमध्ये, म्हात्रेने पाच सामन्यांमध्ये ४४.०० च्या सरासरीने १७६ धावा केल्या आणि त्यात दोन अर्धशतकेही होती. या वर्षी मुंबईसाठी त्याच्या पहिल्या पूर्ण रणजी ट्रॉफी हंगामात, त्याने आठ सामने आणि १४ डावांमध्ये ३३.६४ च्या सरासरीने ४७१ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके आणि एक अर्धशतक समाविष्ट आहे.