Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एमडी आणि गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना ठोकल्या बेड्या

मेफेड्रॉनची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल, दुचाकी असा ४ लाख १४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 30, 2026 | 05:49 PM
पुणे पोलिसांची मोठी कारवाई! एमडी आणि गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या चौघांना ठोकल्या बेड्या
Follow Us
Follow Us:
  • एमडी आणि गांजा विक्रीप्रकरणी आरोपींना अटक
  • ११२ ग्रॅम एमडी आणि ६ किलो गांजा पोलिसांकडून जप्त
  • दोन्ही कारवायांत मिळून ८ लाख ४० हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पुणे :  मेफेड्रॉनची तस्करी करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक एकने अटक केली आहे. त्यांच्याकडून ११२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल, दुचाकी असा ४ लाख १४ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. मुशरफ इसाक शेख (वय २५) आणि सोहेल बाबुराव शेख (वय २५ दोघेही रा. काळेपडळ) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत पोलिस हवालदार अमोल सरडे यांनी तक्रार दिली आहे.

 

याप्रकरणी काळेपडळ पोलिसांत गुन्हा नोंद केला आहे. ही कारवाई पोलिस उपायुक्त गौहर हसन, वरिष्ठ निरीक्षक तृप्ती सोनवणे, उपनिरीक्षक योगेश कोतकर, अमोल सरडे तसेच त्यांच्या पथकाने केली आहे. पुणे शहरात ड्रग्जचे वितरण करणाऱ्या तसेच त्याचा विक्री करणाऱ्यांविरोधातील कारवाई तीव्र करण्यात आली आहे. यादरम्यान अमली पदार्थ विरोधी पथक एक काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी दोघे एमडी विक्रीच्या तयारीत असल्याची माहिती पोलिस अमंलदार अमोल सरडे यांना मिळाली. या माहितीनुसार, पथकाने समृद्धी चौकात सापळा रचला. दोघे संशयित दिसताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता आरोपी मुशरफकडून ५२ ग्रॅम तर सोहेलकडून ६० ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत संबंधित ड्रग्जची किंमत ३ लाख ६० हजार रुपये आहे. या दोघांनी एमडी कोठून आणले तसेच ते कोणाला विक्री करणार होते, यासंदंर्भाने पोलिसांची चौकशी सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : दौंडच्या हिंगणीगाडा येथील स्टोन क्रशरचा प्रश्न पुन्हा पेटणार; सुप्रिया सुळेंची थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना अटक

गांजा विक्रीच्या तयारीत असलेल्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथक दोनने अटक केली आहे. त्यांच्याकडून ६ किलो गांजा, मोबाइल, रोकड असा मिळून ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला आहे. आशिष रमेश शिंदे (वय २१) आणि आशितोष उर्फ स्वप्नील सोमनाथ कांबळे (वय २७ रा. शिवतेजनगर, बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करताना स्वारगेट बसस्थानक परिसरात दोघे संशयितरित्या वावरताना दिसून आले. त्यामुळे आशिष शिंदे आणि आशितोष कांबळे याला ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता ३ लाखांचा ६ किलो गांजा, रोकड व मोबाईल असा ४ लाख २६ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिस निरीक्षक जीवन माने व त्यांच्या पथकाने केली आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुण्यात एमडी तस्करीप्रकरणी कोणाला अटक करण्यात आली?

    Ans: मुशरफ इसाक शेख (वय २५) आणि सोहेल बाबुराव शेख (वय २५, दोघेही रा. काळेपडळ) यांना अटक करण्यात आली.

  • Que: आरोपींकडून किती मुद्देमाल जप्त करण्यात आला?

    Ans: आरोपींकडून ११२ ग्रॅम एमडी, दोन मोबाइल आणि दुचाकी असा एकूण ४ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

  • Que: पोलिसांनी ही कारवाई कुठे केली?

    Ans: काळेपडळ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील समृद्धी चौकात सापळा रचून अमली पदार्थ विरोधी पथकाने ही कारवाई केली.

Web Title: The police in pune have taken major action against those involved in drug trafficking nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Arrested News
  • Drugs
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई
1

पुणे पोलिस आयुक्तांचा सलग दुसऱ्या दिवशी दणका! आणखी चार पोलिस कर्मचाऱ्यांचे निलंबन; दोन दिवसांत आठ जणांवर कारवाई

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा
2

आधी तरुणी बनून मैत्री, नंतर पोलिस बनून ब्लॅकमेलिंग; पुण्यातील आत्महत्या प्रकरणाचा उलगडा

Jammu Kashmir : काश्मीरमध्ये सायकलिंगचा जल्लोष! 3 हजार सायकलस्वारांचा सहभाग
3

Jammu Kashmir : काश्मीरमध्ये सायकलिंगचा जल्लोष! 3 हजार सायकलस्वारांचा सहभाग

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं
4

आधी त्रास, नंतर मारहाण अन् अखेर खून; एकतर्फी प्रेमातून महिलेला संपवलं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.