ICC Women's Cricket World Cup 2025: Political drama on the cricket field? This issue heated up even before the India-Pakistan match
IND VS PAK : आशिया कप २०२५ मध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला. यावेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेक वाद झाल्याचे बघायाल मिळाले. खेळाडूंनी हस्तांदोलन न करण्यापासून ते ट्रॉफी सादर करण्यापर्यंत, वादांनी मथळे बनवले होते. अंतिम सामना जिंकल्यानंतर, भारतीय खेळाडूंनी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मोहसीन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास नमकार दर्शवला होता आणि भारतीय संघ ट्रॉफीविनाच मायदेशी परतला होता. महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ मध्येही असेच वाद होताना दिसत आहेत.
हेही वाचा : IND vs WI: भारताविरुद्ध जॉन कॅम्पबेलचा मोठा पराक्रम! कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ कामगिरी
महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धा ३० सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे. २ ऑक्टोबर रोजी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात एक महत्त्वाचा सामना खेळला गेला. या सामन्यादरम्यान, काश्मीरचा मुद्दा अचानक कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढे आला. पाकिस्तानची माजी कर्णधार आणि समालोचक सना मीर यांनी लाईव्ह कॉमेंट्री दरम्यान म्हटली की, खेळाडूंनी आझाद काश्मीर मध्ये सराव केला. तिच्या विधानाने लगेचच एक नवीन वादाला तोंड फुटले आहे.
त्यामुळे आता प्रश्न उपस्थित झाला आहे की, सना मीरने हे जाणूनबुजून म्हटले आहे की ते असत्य आहे. तथापि, हे स्पष्ट आहे की या विधानामुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये पुन्हा एकदा तणाव वाढल्याचे दिसत आहे. प्रकरण वाढत असताना, आता आयसीसीवर या प्रकरणात कारवाई करण्यासाठी दबाव वाढला आहे. सना मीरवर काय कारवाई करण्यात येणार का? हे पाहणे रंजक असणार आहे.
आशिया कप २०२५ स्पर्धेत भारताने पाकिस्तानला पराभूत करून जेतेपद जिंकले. ही स्पर्धा वादांनी भरलेली होती. २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला.त्यानंतर, भारतीय लष्कराकडून पाकिस्तानमधील दहशतवादी अड्ड्यांवर कारवाई करण्यात आली होती. या घटनेमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यात ताणाव वाढला आणि त्याचा परिणाम हा आशिया कपमध्ये देखील दिसून आला. या हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान पहिल्यांदाच एकमेकांसमोर उभे ठाकले. भारतीय संघाने या स्पर्धेत पाकिस्तानचा ३ सामन्यांमध्ये पराभूत केला. भारतीय खेळाडूंनी तिन्ही सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करण्यास स्पष्टपणे नकार दर्शवला होता. त्यावरून वाद निर्माण झाला होता.
हेही वाचा : IND vs WI 1st Test : ध्रुव जुरेलचा हवेत सूर! वेस्ट इंडीजविरुद्ध टिपला जादुई झेल; व्हिडिओ व्हायरल
महिला विश्वचषकात काश्मीर मुद्द्यामुळे पुन्हा एकदा वातावरण तापले असून क्रिकेट आणि राजकारण वेगळे ठेवण्याचे आवाहन करून देखील वाद निर्माण होताना दिसत आहे. आयसीसी या प्रकरणावर आता काय भूमिका घेणार आणि सना मीरच्या विधानावर काही कारवाई करणार का? हे बघावे लागणार आहे.