फोटो सौजन्य - IndianPremierLeague सोशल मीडिया
Chennai Super Kings vs Delhi Capitals match report : चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना एम. ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळवला गेला. या सामन्यात चेन्नईच्या फॅन्सला फलंदाजांनी आणखी एकदा निराश केले आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सला दिल्लीने २५ धावांनी पराभूत केले आहे. या सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा सलग तिसरा पराभव झाला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने चेन्नईला २५ धावांनी पराभूत केले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा संघ या विजयासह स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे.
या सामन्यात आणखी एकदा चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी निराश केले आहे. संघाचे सलामीवीर फलंदाज डेवाॅन कॉन्वेने आणि रचिन रवींद्र यांनी संघासाठी विशेष कामगिरी करू शकला नाही. डेवाॅन कॉन्वेने आयपीएल २०२५ च्या पहिल्या सामन्यात १४ चेंडूंमध्ये १३ धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाड या सामन्यातही विशेष कामगिरी करू शकला नाही. तो ५ धावा करून बाद झाला. रचिन रवींद्र आणखी एकदा फेल ठरला मागील सामन्यमध्ये देखील तो संघासाठी मोठी कामगिरी करू शकला नाही, या सामन्यात देखील त्याने फक्त संघासाठी ३ धावा केल्या आणि मुकेश कुमारने बाहेरचा रस्ता दाखवला.
Hat-Trick of Wins ✅
Memorable win at Chepauk after 1⃣5⃣ years ✅@DelhiCapitals cap off a commanding 2⃣5⃣-run victory over #CSK 🥳Scorecard ▶ https://t.co/5jtlxucq9j #TATAIPL | #CSKvDC pic.twitter.com/D9oWDI4hN2
— IndianPremierLeague (@IPL) April 5, 2025
शिवम दुबे आणखी एकदा फेल ठरला. त्याचा या सीझनमध्ये फ्लॉप ठरला आहे. शिवम दुबेने संघासाठी १५ चेंडूंमध्ये १८ धावा केल्या. या सामन्यांमध्ये विजय शंकरने संघासाठी कमालीची फलंदाजी केली पण तो संघाला विजयापर्यत नेऊ शकला नाही. विजय शंकरने ५४ चेंडूंमध्ये ६९ धावा केल्या. तर एम एस धोनीने संघासाठी २६ चेंडूंमध्ये ३० धावा केल्या आणि नाबाद राहिला.
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स या सामन्यात दिल्लीच्या संघाने चेन्नईला २५ धावांनी पराभूत केले आहे. त्याचबरोबर दिल्ली कॅपिटल्सचा संघ या विजयासह स्पर्धेमध्ये अपराजित राहिला आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना, सीएसके २० षटकांत फक्त १५८/५ धावाच करू शकले. एमएस धोनी आणि विजय शंकर यांनी जबाबदारी सांभाळली. पण दोघांनीही हळू फलंदाजी केली. दोन्ही खेळाडू मधल्या षटकांमध्ये मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरले. विजयने ५४ चेंडूत ६९ धावा केल्या तर धोनीने २६ चेंडूत ३०* धावा केल्या. शेवटी, सीएसकेने २५ धावांनी सामना गमावला.