फोटो सौजन्य - X Eijazwasim सोशल मीडिया
Khushdil Shah Video : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे, याआधी पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये T२० मालिका झाली. तर आज पाकिस्तान संघ न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना पार पडला. यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने शेवटच्या तिसऱ्या सामन्यांमध्ये पाकिस्तानला ४३ धावांनी पराभूत केले. या न्यूझीलंडच्या विजयासह पाकिस्तानला एकदिवसीय मालिकेमध्ये ०-३ असा पराभवाचा सामना मालिकेमध्ये करावा लागला आहे. याच सामान्यादरम्यानचा आता एक व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, यामध्ये पाकिस्तानी खेळाडू प्रेक्षकांवर संतापलेला दिसत आहे.
‘जर मी क्रिकेटपटू नसतो तर गँगस्टर झालो असतो’, पाकिस्तानी क्रिकेटपटूच्या ‘या’ विधानाने खळबळ
पाकिस्तानी क्रिकेटपटू खुसदिल शाहचे काही फोटो येथून समोर आले आहेत. या छायाचित्रांमध्ये खुसदिल शाह प्रेक्षकांशी संवाद साधताना दिसत आहे. हा संवाद म्हणता येणार नाही प्रेक्षकांनी वाद घालताना दिसत आहे, यावेळी खेळाडूला पाकिस्तान संघाचे क्रिकेटपटू आणि काही सुरक्षा कर्मचारी खुसदिल शाहला थांबवताना दिसत आहेत. पण त्यांनी थांबल्यानंतरही खुसदिल शाह थांबत नाहीयेत. मिळालेल्या माहितीनुसार, मैदानात उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी काही कमेंट केल्या होत्या. यानंतर, खुसदिल शाह स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत आणि प्रेक्षकांशी वाद घालू लागले.
Pakistan’s Khushdil Shah was involved in a fiery exchange with fans at Bay Oval after their 3-0 ODI series loss to New Zealand. 👀#NZvPAK #KhushdilShah #Pakistan pic.twitter.com/NvUMxmJ2K9
— Sportskeeda (@Sportskeeda) April 5, 2025
सामना संपल्यानंतर पाकिस्तानी खेळाडू मैदान सोडत होते असे म्हटले जाते. यावेळी काही प्रेक्षकांनी खेळाडूंवर वैयक्तिक टिप्पण्या केल्या. खुसदिल शाह हे सहन करू शकले नाहीत. तो प्रेक्षकांना उत्तर देऊ लागला. सुरक्षा कर्मचारी आणि सहकारी खेळाडूंनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण खुसदिल शाह सहमत नव्हते.
Video evidence 📸
Tense moment between Khushdil Shah and fans#PAKvNZ #NZvPaKpic.twitter.com/jtmQd8TS9i
— Ash (@Ashsay_) April 5, 2025
याआधीही न्यूझीलंडमध्ये खुसदिल शाहसोबत एक वाद झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान त्याला त्याच्या मॅच फीच्या ५० टक्के दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर खुसदिल शाहने फलंदाजी करताना किवी गोलंदाज फोक्सला फटका मारला होता. त्याला तीन डिमेरिट पॉइंट्सही मिळाले.
खुसदिल शाहला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तिसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी केली. हा सामना ४२-४२ षटकांचा खेळवण्यात आला. न्यूझीलंडने आठ विकेट गमावून २६४ धावा केल्या. पण लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २२१ धावांवरच बाद झाला. न्यूझीलंडने हा सामना ४३ धावांनी जिंकला आणि मालिकाही जिंकली. न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू मायकेल ब्रेसवेलला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. ब्रेसवेलने ५९ धावा केल्या आणि ३९ धावा देऊन एक विकेट घेतली. बेन सियर्सला मालिकावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने १० विकेट्स घेतल्या.