Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CSK Vs GT Pitch Report: चेन्नई अन् गुजरात भिडणार; अहमदाबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट

CSK vs GT Pitch Report: गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर महत्वाचा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात,फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार? वाचा पिच रिपोर्ट.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 21, 2026 | 03:36 PM
CSK Vs GT Pitch Report: चेन्नई अन् गुजरात भिडणार; अहमदाबादची खेळपट्टी कोणाला देणार साथ? वाचा पिच रिपोर्ट
Follow Us
Follow Us:
  • चेन्नईविरुद्ध गुजरात सामना
  • फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार?
  • CSK vs GT पिच रिपोर्ट
आयपीएल २०२६ च्या ६६ व्या साखळी सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स भिडणार आहेत. हा महत्वाचा सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. प्लेऑफच्या दृष्टीने गुजरातसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. गुजरात पॉईंट्स टेबलमध्ये टॉप -२ मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी मैदानात उतरतील, तर असताना चेन्नईचा संघ विजयाने हंगामाचा शेवट गोड करण्यासाठी खेळताना दिसणार आहे. या सामन्यात कशी असेल पिच अन् संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

Mohammed Shami: शामी-हसीन जहाँ वादात मोठा ट्विस्ट! कोर्टाचा निर्णय क्रिकेटपटूसाठी दिलासादायक, काय आहे संपूर्ण प्रकरण?

CSK vs GT पिच रिपोर्ट

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी सामान्यतः फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. येथे चेंडू बॅटवर सहज येतो त्यामुळे मोठे फटके खेळणे सोपे होते. म्हणूनच या मैदानावर अनेकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळते. सुरुवातीच्या काही ओव्हरमध्ये वेगवान गोलंदाजांना थोडी स्विंग आणि सीम मूव्हमेंट मिळू शकते. खेळपट्टी कोरडी राहिल्यास मधल्या ओव्हरमध्ये फिरकी गोलंदाजही प्रभावी ठरू शकतात. मात्र, जसजसा सामना पुढे जातो तसतशी खेळपट्टी फलंदाजीसाठी अधिक चांगली होत जाते. दुसरीकडे, रात्री दव पडल्यास गोलंदाजांना अडचणी येऊ शकतात. त्यामुळे टॉस जिंकणारा कर्णधार प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील IPL आकडेवारी

या मैदानावर आयपीएलचे अनेक हायस्कोअरिंग सामने झाले आहेत. पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १७० ते १८० दरम्यान राहिली आहे. काही सामन्यांमध्ये २०० पेक्षा जास्त धावसंख्याही सहज उभारण्यात आली आहे. धावांचा पाठलाग करणाऱ्या संघांचाही या मैदानावर चांगला रेकॉर्ड आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात फलंदाजी करणे तुलनेने फायदेशीर मानले जाते.

हेड टू हेड रेकॉर्ड

आयपीएलमध्ये आतापर्यंत गुजरात आणि चेन्नई यांच्यात एकूण ९ सामने खेळले गेले आहे. त्यामध्ये गुजरातने ५ आणि चेन्नईने ४ चार सामने जिंकले आहेत.

संभाव्य प्लेइंग ११

गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (विकेटकीपर), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, राशीद खान, अरशद खान, कागिसो रबाडा, साई किशोर, मोहम्मद सिराज

चेन्नई सुपर किंग्स : संजू सॅमसन (विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), उर्विल पटेल, कार्तिक शर्मा, डेवाल्ड ब्रेविस, शिवम दुबे, प्रशांत वीर, अकील हुसेन, नूर अहमद, अंशुल कंबोज, स्पेन्सर जॉन्सन.

IND Vs AFG: अफगाणिस्तानविरुद्ध BCCI ने दिली ‘या’ नवीन चेहऱ्यांना संधी, दिग्गज खेळाडूंचा पत्ता कट

Web Title: Csk vs gt ipl 2026 match preview pitch report playing xi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:31 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • Gujarat Titans
  • IPL 2026

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.