IPL चा ‘बॉस’ ठरला Virat Kohli; कमाईचा आकडा वाचून फिरतील डोळे, रोहित-धोनीही पडले मागे
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यासाठी आकाश दीपला दुखापतीमुळे संघात स्थान मिळू शकले नाही, तर रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि जसप्रीत बुमराह या दिग्गज खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर, एकदिवसीय सामन्याच्या मालिकेसाठी हर्षित राणा, ऋषभ पंत, आयुष बडोनी यशस्वी जैस्वाल, रवींद्र जडेजा आणि मोहम्मद सिराज सारख्या दिग्गजांना संघातून वगळण्यात आले आहे. दुखापतग्रस्त असल्याने हर्षित राणाला संघात स्थान मिळाले नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद सिराज आणि ऋषभ पंत यांना त्यांच्या कामगिरीमुळे संघातून वगळण्यात आले आहे. टीम मॅनेजमेंटला रवींद्र जडेच्याच्या ऐवजी नवीन पर्याय आजमावून पाहायचे आहे म्हणून त्यालाही विश्रांती देण्यात आली आहे. भारताने शेवटची कसोटी मालिका दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध खेळली होती.
गुरनूर ब्रार
पंजाबचा वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारला अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी संघात पहिल्यांदाच स्थान मिळाले आहे. गुरनूरने डिसेंबर २०२२ मध्ये गोव्याविरुद्ध लिस्ट ए मध्ये पदार्पण केले होते. त्याने २०२३ मध्ये त्याने पंजाब किंग्स संघाकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. नंतर गुजरात टायटन्सने त्याला १.३० कोटी रुपयांना संघात घेतले.
अफगाणिस्तानविरुद्धच्या कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही मालिकांसाठी महाराष्ट्राचा फिरकी गोलंदाज हर्ष दुबेची निवड संघात करण्यात आली आहे. ज्युनियर क्रिकेटमधील प्रभावी कामगिरीनंतर, त्याला विदर्भ वरिष्ठ संघात स्थान मिळाले. देशांतर्गत क्रिकेटमध्येही दुबे विदर्भ संघाचे प्रतिनिधित्व करतो. २०२४-२५ च्या रणजी ट्रॉफीमध्ये ६९ विकेट्स घेत आपल्या दमदार कामगिरीने अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
जव्या हाताचा वेगवान गोलंदाज प्रिन्स यादवला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संधी देण्यात आली आहे. प्रिन्सने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पदार्पण हंगामात ७. ५४ च्या इकॉनोमी रेटने ११ विकेट्स घेतले. तो या स्पर्धेत दिल्लीचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनला.
अफगाणिस्तान कसोटी मालिकेसाठी मानव सुथारला संघात स्थान देण्यात आले आहे. मानव सुथार देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानकडून आणि आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सकडून खेळतो. सुथारने २०२२-२३ च्या रणजी ट्रॉफी हंगामात उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने संपूर्ण हंगामात ३९ विकेट्स घेतले. देशांतर्गत क्रिकेटमधील उत्कृष्ट कामगिरीनंतर, त्याला आयपीएलसारख्या मोठ्या मंचावर आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली. आयपीएल २०२४ साठी गुजरात टायटन्सने त्याला २० लाख रुपयांना विकत घेतले.






