फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
IND vs AUS 1st test 2nd Day Live Updates : भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन क्रिकेट विश्वामधील बलाढ्य संघ आहेत. या दोन्ही संघांमधील क्रिकेट मैदानावरील शत्रुत्व पाहायला प्रेक्षकांना प्रचंड आवडतं. २२ नोव्हेंबरपासून या दोन संघांमधील महायुद्ध सुरू झाले आहे. आज भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या कसोटी सामन्याचा दुसरा दिवस सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये भारताच्या संघाला ऑस्ट्रेलियाने १५० धावांवर बाद केले, सध्या दुसरी इनिंग सुरू आहे यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजी करत आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ ६७ धावांवर ७ विकेट्स गमावले आहेत. आज भारताच्या संघाला लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाला रोखणे गरजेचे आहे. वेळेवेळी आम्ही तुम्हाला बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये होणाऱ्या सामन्याच्या संदर्भात अपडेट देणार आहोत.
23 Nov 2024 02:49 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामान्यांच्या दुसऱ्या इनिंगमधील ५० ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये यशस्वी जयस्वालने १७५ चेंडूंमध्ये ७४ धावा केल्या आहेत तर केएल राहुलने ५६ धावांची खेळी खेळली आहे. यामध्ये आता भारताच्या संघाने १९१ धावांची आघाडी घेतली आहे.
23 Nov 2024 01:52 PM (IST)
भारताचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वाल ने पुन्हा एकदा क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली आहे. त्याने भारताच्या संघासाठी ऑस्ट्रेलियामध्ये पहिले अर्धशतक झळकावले आहे. यशस्वी जयस्वालने १२४ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या आहेत.
𝐅𝐈𝐅𝐓𝐘
Maiden Test 50 for @ybj_19 on Australian soil. He brings up the half century in 123 balls! His opening stand with @klrahul is now worth 100 runs.
India lead by 146 runs.
Live - https://t.co/gTqS3UPruo… #AUSvIND #TeamIndia pic.twitter.com/9GMd1q1vUq
— BCCI (@BCCI) November 23, 2024
23 Nov 2024 12:47 PM (IST)
दुसऱ्या इनिंगमध्ये दुसऱ्या सेशनपर्यत भारताच्या संघाने आतापर्यत २६ ओव्हरचा खेळ खेळाला आहे. यामध्ये टीम इंडियाने एकही विकेट न गमावता भारताच्या संघाने या सामन्यात १३० धावांची आघाडी घेतली आहे. यात यशस्वी जयस्वालने ४२ धावांची खेळी खेळली आहे तर केएल राहुलने ३४ धावांची खेळी खेळली आहे दोघेही सध्या मजबूत स्थितीत संघासाठी उभे आहेत.
23 Nov 2024 12:14 PM (IST)
सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताच्या संघाने १२१ धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुलने २९ धावांची खेळी खेळली आहे तर दुसऱ्या इनिंगमध्ये यशस्वी जयस्वालने ३८ धावांची खेळी खेळली आहे.
23 Nov 2024 12:10 PM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आतापर्यत २० ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये भारताचे दोन्ही फलंदाज मैदानावर टिकून आहेत. भारताच्या संघाने २० ओव्हरमध्ये एकही विकेट न गमावता ७५ धावा केल्या आहेत.
Upper cut and a swoop shot for fours!@ybj_19 showing his full range in just his first game on Australian soil.
Live - https://t.co/gTqS3UPruo…… #AUSvIND pic.twitter.com/3XaKj1l9z2
— BCCI (@BCCI) November 23, 2024
23 Nov 2024 11:18 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात दुसऱ्या इनिंगमध्ये १० ओव्हरचा खेळ झाला आहे. यामध्ये भारताच्या संघाने २७ धावा केल्या आणि एकही विकेट गमावली नाही. यामध्ये यशस्वी जयस्वालने १४ धावा केल्या आहेत तर केएल राहुल ७ धावा केल्या आहेत.
23 Nov 2024 10:41 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना सुरु झाला आहे. दुसऱ्याच दिनी या सामन्याची दुसरी इनिंग सुरु झाली आहे. यामध्ये आता भारताच्या संघासाठी यशस्वी जयस्वाल आणि केएल राहुल सलामी फलंदाज म्हणून मैदानामध्ये आले आहेत.
23 Nov 2024 09:57 AM (IST)
नाव | धावा | ओव्हर | विकेट |
---|---|---|---|
जसप्रीत बुमराह | 30 | 18.0 | 5 |
वॉशिंग्टन सुंदर | 1 | 2.0 | 0 |
नितीश कुमार रेड्डी | 4 | 3.0 | 0 |
हर्षित राणा | 48 | 15.2 | 3 |
मोहम्मद सिराज | 20 | 13.0 | 2 |
23 Nov 2024 09:51 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला 104 धावांवर बाद केले आहे. सध्या भारताच्या संघाकडे 46 धावांची आघाडी आहे.
23 Nov 2024 09:09 AM (IST)
भारताच्या संघाला पहिल्या इनिंगमधील शेवटचा ऑस्ट्रेलियाचा विकेट घ्यायचा आहे. ऑस्ट्रेलियासाठी सध्या हेजलवूड आणि स्टार्क फलंदाजी करत आहेत. आता भारताचा कर्णधार जसप्रीत बुमराहने नितीश कुमार रेड्डी गोलंदाजी दिली आहे.
23 Nov 2024 08:37 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पहिल्या इनिंगमध्ये आता ऑस्ट्रेलियाचा ३६ ओव्हरचा खेळ झाला आहे यामध्ये ऑस्ट्रेलियाचा संघाने ८२ धावा करून ९ विकेट्स गमावले आहेत.
23 Nov 2024 08:25 AM (IST)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात भारताचा संघाने ऑस्ट्रेलियाचा नववा विकेट नॅथन लिऑन याचा घेतला आहे. भारताच्या संघाला आता फक्त १ विकेटची गरज आहे.
1ST Test. WICKET! 33.2: Nathan Lyon 5(16) ct K L Rahul b Harshit Rana, Australia 79/9 https://t.co/dETXe6cqs9 #AUSvIND
— BCCI (@BCCI) November 23, 2024
23 Nov 2024 08:23 AM (IST)
भारताचा कॅप्टन जसप्रीत बुमराहने भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामान्यांच्या दुसऱ्याचं दिनी पहिल्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूला अलेक्स कॅरीला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला आहे.