Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: ड्रेसिंग रूममध्ये David Miller ला कोसळले रडू, तरळले अश्रू; हेमांग बदानीने दिला आधार

गुजरात टायटन्सकडून दिल्ली कॅपिटल्सचा 1 धावेने पराभव झाल्यानंतर डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये स्पष्टपणे निराश दिसत होता. शेवटच्या षटकात एकही धाव न काढल्यामुळे दिल्ली कॅपिटल्सला मोठा फटका बसला.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 09, 2026 | 11:36 AM
डेव्हिड मिलर झाला हताश, व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

डेव्हिड मिलर झाला हताश, व्हिडिओ व्हायरल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • ड्रेसिंग रूममध्ये डेव्हिड मिलरचे डोळे पाणावले
  • गुजरात टायटन्सकडून केवळ १ धावेने झाला पराभव 
  • डेव्हिड मिलरची मेहनत गेली फुकट 
IPL 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्ससाठी हिरो बनण्याच्या उंबरठ्यावर असलेला डेव्हिड मिलर, गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात खलनायक ठरला. मिलरने या सामन्यात दिल्ली कॅपिटल्ससाठी नाबाद ४१ धावा केल्या, पण शेवटच्या षटकात एकही धाव न काढल्याने दिल्लीचे सर्व प्रयत्न व्यर्थ ठरले. दिल्ली कॅपिटल्स हा सामना केवळ एका धावेने हरली, जो सामना ते जिंकू शकले असते किंवा ज्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये लागला असता. 

दिल्ली जिंकावी यासाठी एका बाजूने केएल राहुलने पूर्ण प्रयत्न केले होते. तर सामना गमावणार अशी स्थिती असतानाच डेव्हिड मिलरने सामना खेचून आणला होता. मात्र शेवटच्या षटकात सर्व परिस्थिती पालटली आणि याचे सर्वाधिक वाईट डेव्हिड मिलरला वाटणं साहजिक होतं आणि तसंच झालं. सामन्यानंतर डेव्हिड पूर्णपणे हताश झालेला दिसून येत होता आणि त्याला कॅप्टन अक्षर पटेलनेही सावरायचा प्रयत्न केला. मात्र नंतरही ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या डेव्हिडचा व्हिडिओ आता तुफान व्हायरल होत आहे. त्याची निराशा आणि त्रास स्पष्टपणे दिसून येत आहे. 

DC vs GT: ‘समजूतदारीने खेळले असते तर…’, Axar Patel ने कोणाच्या डोक्यावर फोडले खापर? केवळ 1 धावांनी गमावला सामना

डेव्हिडचा हताश व्हिडिओ 

Backing our Tiger, always 🫂💙 pic.twitter.com/pAFouiVmVH — Delhi Capitals (@DelhiCapitals) April 9, 2026

दिल्ली कॅपिटल्सच्या या हृदयद्रावक पराभवानंतर डेव्हिड मिलर पूर्णपणे निराश झालेला दिसत होता. सामन्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये मिलर पूर्णपणे खचलेला दिसत आहे. एकही धाव न काढण्याच्या आपल्या निर्णयाबद्दल त्याला इतका पश्चात्ताप होत होता की त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. या व्हिडिओमध्ये संघाचे प्रशिक्षक हेमांग बदानी हेदेखील मिलरचे सांत्वन करताना दिसत आहेत.

अक्षर पटेलनेही डेव्हिड मिलरचे सांत्वन केले

शेवटच्या चेंडूवर कुलदीप धावबाद झाल्यानंतर दिल्ली गुजरातविरुद्धचा सामना हरली. यापूर्वी मिलरने षटकाच्या पाचव्या चेंडूवर एक सोपी धाव घेण्याची संधी गमावली होती. जर डेव्हिड मिलरने धाव घेतली असती, तर स्ट्राईक कुलदीपकडे गेली असती आणि धावसंख्या बरोबर झाली असती, पण मिलरने तसे केले नाही. मिलरला वाटले की तो शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका मारू शकेल, पण प्रसिद्ध कृष्णाच्या अप्रतिम चेंडूने मिलरच्या योजनांवर पाणी फेरले.

मिलरला शेवटचा चेंडू मारता आला नाही. सामना वाचवण्यासाठी त्याने कुलदीपसोबत धावसंख्या बरोबर करण्याचा प्रयत्न केला, पण जोस बटलरने त्याला धावबाद केले. गुजरातने हा सामना एका धावेने जिंकला. सामना संपताच मिलरच्या लक्षात आले की त्याने एक मोठी चूक केली आहे. तो मैदानावरच भावूक झाला. कर्णधार अक्षर पटेलने त्याचे सांत्वन केले. सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २१० धावा केल्या, तर दिल्लीला केवळ २०९ धावाच करता आल्या.

DC Vs GT: मिलरने केला दिल्लीचाच ‘गेम’; ‘त्या’ एका चुकीमुळे कॅपिटल्सचा 1 रन्सने दारुण पराभव

Web Title: Dc vs gt david miller viral video broke down in dressing room after match teary eyed hemang badani took care

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • David Miller
  • DC vs GT
  • IPL 2026

संबंधित बातम्या

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर
1

RCB Vs SRH Live: ‘पिक्चर अभी बाकी है’! पाटीदारने बिघडवला ‘एसआरएच’चा खेळ; हैदराबाद वेटिंगवर

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट
2

तूफान आलंया! SRH ‘या’ त्रिमूर्तींनी RCB ला पालापाचोळ्यासारखं उडवलं; बंगळुरूला दिले 256 रन्सचे टार्गेट

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय
3

SRH Vs RCB Live: आज लढाई टॉप 2 ची! पॅट कमिन्सने जिंकला टॉस; घेतला ‘हा’ निर्णय

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम
4

IPL 2026 मध्ये गोलंदाज ठोकणार शतक! ‘स्विंग’चा बादशाह Bhuvneshwar Kumar करणार ‘हा’ विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.