
WPL 2026 Final: RCB writes another victorious chapter! Defeating DC by 6 wickets, they won the WPL 2026 title; the Smriti-Georgia duo shone.
DC vs RCB, WPL 2026 Final : महिला प्रीमियर लीग २०२६ चा अंतिम सामना आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वडोदरा येथील कोटाम्बी स्टेडियमवर खेळला गेला. या सामान्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने दिल्ली कॅपिटल्सचा ६ विकेट्सने पराभव करून महिला प्रीमियर लीग २०२६ चे जेतेपद आपल्याकडे कायम राखले. संघाने प्रथम फलंदाजी करत जेमिमाह रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ४ गडी गमावून २०३ धावा केल्या. प्रतिउत्तरात आरसीबीने कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वॉल यांच्या अर्धशतकांच्या जोरावर हे लक्ष्य १९.४ षटकात ४ गडी गमावून पूर्ण केले आणि सलग दोन वेळा महिला प्रीमियर लीगचे विजेतेपद आपल्या नावे केले. दिल्ली कॅपिटल्सला यावेळी देखील विजेतेपदाला गवसणी घालता आली नाही. परिणामी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दिल्लीकडून चिनेल हेन्रीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
महिला प्रीमियर लीग २०२६ च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर दिल्ली कॅपिटल्सला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. दिल्लीने संघाने प्रथम फलंदाजी करत जेमिमाह रॉड्रिग्सच्या अर्धशतकाच्या जोरावर ४ गडी गमावून २०३ धावा केल्या. जेमिमाह रॉड्रिग्सने ३७ चेंडूत ५७ धावा केल्या, तरलॉरा वोल्वार्डने ४४ धावांचे योगदान दिले. तसेच चिनेल हेन्रीने अखेरच्या षटकात वेगवान ३५ धावा केल्या आणि संघाला २०३ पर्यंत पोहचवले. आरसीबीकडून अरुंधती रेड्डी, सायली सातघरे आणि नादिन डी क्लार्क यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
𝘾.𝙃.𝘼.𝙈.𝙋.𝙄.𝙊.𝙉.𝙎 🏆🏆 Royal Challengers Bengaluru have Claimed the Crown once again in spectacular fashion to clinch the #TATAWPL 2026 title ❤️#ClaimTheCrown | #RCBvDC | #Final | @RCBTweets pic.twitter.com/JDKUm3BDqk — Women’s Premier League (WPL) (@wplt20) February 5, 2026
धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. ग्रेस हॅरिस आपल्या संघाच्या ९ धावा असतानाच माघारी गेली. तिला चिनेल हेन्रीने बाद केले. त्यानंतर सलामीवीर कर्णधार स्मृती मानधना आणि वन डाउन आलेली जॉर्जिया वॉल यांनी संघाचा डाव सावरला. या दोघांनी १६५ धावांची भागीदारी रचली. यादोघींनी दिल्लीच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. जॉर्जिया वॉलने ५४ चेंडूत १४ चौकरांच्या मदतीने ७९ धावा केल्या आणि ती बाद झाली. तिला मिन्नू मणीने बाद केले. त्यांनंतर स्मृती मानधनाने थोडा वेळ डाव सांभाळला आणि ती ४१ चेंडूत ८७ धावांची खेळी केली. या खेळीत तिने १२ चौकार आणि ३ षटकार मारले. त्यानंतर ऋचा घोष ६ धावा करून बाद झाली. अखेर राधा यादवने नाबाद १२ धावा आणि नादिन डी क्लार्कने नाबाद ७ धावा करून आरसीबीच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. दिल्लीकडून चिनेल हेन्रीने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या तर नंदनी शर्मा आणि मिन्नू मणीने प्रत्येकी १ विकेट घेतली.
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: लिझेल ली (डब्ल्यू), शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (सकर्णधार), मारिझान कॅप, चिनेल हेन्री, निकी प्रसाद, स्नेह राणा, मिन्नू मणी, श्री चरणी, नंदनी शर्मा
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (कर्णधार), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), राधा यादव, नादिन डी क्लार्क, पूजा वस्त्राकर, अरुंधती रेड्डी, सायली सातघरे, श्रेयंका पाटील, लॉरेन बेल