सर्वोच्च न्यायालयाने अनुराग ठाकूर यांच्यावरील बंदी उठवली(फोटो-सोशल मीडिया)
The Supreme Court has lifted the ban on Anurag Thakur : सर्वोच्च न्यायालयाकडून बीसीसीआयचे माजी अध्यक्ष, हिमाचल प्रदेशचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयमध्ये पद धारण करण्यावरील बंदी उठवण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे माजी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनुराग ठाकूर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय)पदाधिकारी म्हणून काम करण्यास मुक्त आहेत. तसेच, मिथुन मनहास यांनी नुकतेच बीसीसीआय अध्यक्षपद स्वीकारले आहे. तथापि. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यामुळे आता, ठाकूर यांना पुन्हा पद मिळेल का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
लोढा समितीच्या शिफारशी लागू न केल्याबद्दल २०१७ मध्ये ठाकूर यांना त्यांच्या पदावरून काढून टाकण्यात आले होते. लोढा समितीच्या नियमांमध्ये वयोमर्यादा आणि सरकारी पदांसह अनेक कठोर तरतुदी समाविष्ट होत्या. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय भारतीय क्रिकेटच्या प्रशासकीय रचनेमध्ये मोठा वळण घेणारा मानला जातो. या निर्णयामुळे अनुराग ठाकूर बीसीसीआयच्या बैठकांना उपस्थित राहण्यास कोणती देखील अडचण येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने २०१७ च्या आपल्या आदेशात सुधारणा करून अनुराग ठाकूर यांच्यावरील बीसीसीआयमधील पदावर राहण्यावरील बंदी उठवली आहे.
या आदेशात अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अंतर्गत कामकाजापासून दूर राहण्याचे निर्देश दिले गेले होते. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती तेव्हा अनुराग ठाकूर हे बीसीसीआयच्या अध्यक्षपदी विराजमान होते. त्यावेळी तत्कालीन सरन्यायाधीश तीरथ सिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकडून आदेश जारी करण्यात आले आणि त्यांना बीसीसीआयच्या कामकाजापासून दूर राहण्याचे आदेश दिले होते.
सध्याचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाकBडून आता त्या आदेशात सुधारणा करण्यात आली आहे. मुख्य न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय माल्य बागची यांच्या खंडपीठाने आता अनुराग ठाकूर यांना बीसीसीआयच्या अंतर्गत, प्रशासकीय आणि इतर बाबींमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे की, “जानेवारी २०१७ मध्ये लावलेली बंदी ही आजीवन अपात्रता नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की आजीवन बंदी घालण्याचा त्यांचा हेतू नव्हता आणि तो योग्य देखील नव्हता. अनुराग ठाकूर यांनी आधीच बिनशर्त माफी मागितली होती, जी न्यायालयाने स्वीकारली.






