
DC vs RCB, WPL 2026: Mighty RCB collapses against Delhi; Jemimah's army faces a target of 110 runs
DC vs RCB, WPL 2026 : महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आमनेसामने आहेत. वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर खेळवण्यात येणाऱ्या या सामन्यात टॉस गमावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने प्रथम फलंदाजी करत निर्धारित षटकात सर्वबाद १०९ धावा केल्या आहेत. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी ११० धावा कराव्या लागणार आहेत. दिल्लीकडून नंदीनी शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO
वडोदरा येथील बीसीए स्टेडियमवर सुरू असलेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. आरसीबीची सुरुवात चांगली झाली नाही. ३६ धावांवर सलामीवीर ग्रेस हॅरिसबाद झाली. ती ९ धावा करून बाद झाली. त्यानंतर थोड्या अंतराने विकेट्स जात राहिल्या. कर्णधार स्मृती मानधनाने थोडी झुंज दिली परंतु ती ३४ चेंडूत ३८ धावा करून बाद झाली. या खेळीत तिने ६ चौकार आणि १ चौकार मारला. तिला मिन्नू मणीने बाद झाली. जॉर्जिया वॉल ११, गौतमी नाईक ३, रिचा घोष ५, नदिन डी क्लर्क ५, राधा यादव १८, अरुंधती रेड्डी २, श्रेयंका पाटील ७, सायली सातघरे ३ धावा करून बाद झाले. लॉरेन बेल १ धाव करत नाबाद राहिली. दिल्ली कॅपिटल्सकडून नंदीनी शर्माने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. मारिझान कॅप, चिनेल हेन्री आणि मिन्नू मणी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
Innings Break! A fantastic bowling performance from @DelhiCapitals restricts #RCB to 1⃣0⃣9⃣ 👌💙 2⃣ points loading for? 🤔 Scorecard ▶️ https://t.co/LX37VtsnbS #TATAWPL | #KhelEmotionKa | #RCBvDC pic.twitter.com/U0RKAyataI — Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 24, 2026
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू महिला प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, गौतमी नाईक, रिचा घोष (डब्ल्यू), नदिन डी क्लर्क, राधा यादव, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्स महिला प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, निकी प्रसाद, स्नेह राणा, चिनेल हेन्री, श्री चरणी, नंदनी शर्मा, मिन्नू मणी