T-20 विश्वचषकातून माघारीने बांगलादेशला आर्थिक नुकसान(फोटो-सोशल मीडिया)
Bangladesh will suffer an economic blow : आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेतून बांगलादेश संघाने माघार घेतली आहे. बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये स्थान देण्यात आल्याची अधिकृत घोषणा देखील आयसीसीकडून करण्यात आली आहे. टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेला ७ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेचे संयुक्त याजमानपद भारत आणि श्रीलंका यांच्याकडे आहे. बांगलादेशने या स्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. बीसीबीचे म्हणणे आहे की त्यांना सर्व सामने भारतात खेळायचे नव्हते, परंतु आयसीसीने हा प्रस्ताव फेटाळून लावल्याने बांगलादेशने विश्वचषकात भाग घेण्यास नकार दर्शवला आहे. या निर्णयाने बांगलादेशचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागण्याची शक्यता आहे.
एका वृत्तसंस्था मते, जर बांगलादेशने विश्वचषकात भाग घेतला नाही तर त्यांना सुमारे २४० कोटी रुपयांच्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. प्रसारकांवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या महसुलात सुमारे ६० टक्के किंवा त्याहून अधिक घट होऊ शकतो. याव्यतिरिक्त, ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारत बांगलादेशचा दौरा देखील करण्याची शक्यता कमी होऊन जाईल.
बांगलादेश आणि आयसीसी यांच्यातील वादाचे मूळ हे भारतातील आयपीएल २०२६ मध्ये लपलेले आहे. बांगलादेशी वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर केकेआरने रहमानला ९.२ कोटी रुपयांना (अंदाजे १.५ दशलक्ष डॉलर्स) खरेदी केले होते. याबाबत भारतात निषेध व्यक्त करण्यात आला होता. त्यानंतर रहमानला आयपीएलमधून मुक्त करण्यात आले. या निर्णयामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्ड नाराज होऊन त्यांनी आयसीसीला पत्र लिहून भारतात होणाऱ्या विश्वचषकात न खेळण्याचा निर्णय घोषित केला.
आयसीसीने बांगलादेशची मागणी फेटाळून लावत वेळापत्रकात कोणताही बदल होणार नसल्याचे सांगितले. परिणामी, बांगलादेशने टी २० विश्वचषक स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता बांगलादेश संघाच्या जागी जागी स्कॉटलंडला स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले आहे.
हेही वाचा : तो आला रे! ‘माही मार रहा है’, ऐकायला तयार रहा! IPL 2026 साठी MS DHONI चा सराव सुरू; VIRAL VIDEO
बांगलादेशच्या टी२० विश्वचषकावर टाकलेल्या बहिष्कारामुळे केवळ बोर्डाचे आर्थिक नुकसानच होणार नाही तर संघाच्या आंतरराष्ट्रीय क्रियाकलापांवर देखील याचा परिणाम होणार आहे.






