LSG vs PBKS: KL is not the one to listen in front..! Sanjeev Goenka is not angry with Pant on LSG's defeat, but is smiling..
LSG vs PBKS : आयपीएल 2025 चा हा 18 वा हंगाम सुरू आहे. काल मंगळवारी (दि. 1 एप्रिल) लखनऊमधील एकेना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना खेळवला गेला. या सामन्यामध्ये पंजाबच्या संघाने एलएसजीचा दणदणीत पराभव केला. या विजयाने पंजाबने या हंगामत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. तर दुसरीकडे लखनऊचा मात्र दुसरा पराभव ठरला. पंजाब किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा 8 विकेट्सने पराभूत केले. ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली आयपीएल 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्स संघाला सलग दूसरा पराभव स्वीकारावा लागला. एलएसजी या संघासाठी त्याने आतापर्यंत कर्णधार म्हणून निराशाजनक कामगिरी केल्याचे दिसून येत आहे. पहिल्या सामन्यात त्याला दिल्लीविरुद्ध एकही धाव करता आली नव्हती. यानंतर तो दुसऱ्या सामन्यात 15 तर या तिसऱ्या सामन्यात केवळ 2 धावा करून तंबूत परतला.
हेही वाचा : Bcci central contract : बीसीसीआयचा मोठा फैसला! अय्यरला मोठी भेट तर विराट, रोहितचा राखला सन्मान..
ऋषभ पंतला यावर्षी लखनौ सुपर जायंट्स संघाकडून 27 कोटी रुपयांत खरेदी करण्यात आले आहे. मात्र, आजतागायत त्यांना ही रक्कम वसूल करण्यात करता आलेली नाही. अशा परिस्थितीत चाहते लखनऊचे मालक संजीव गोएंका यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहेत. संजीव गोयंका गेल्या वर्षभरापासून चर्चेत आले होते. त्यामागील कारण म्हणजे त्याचा केएल राहुलवर व्यक्त केलेला संताप.
आयपीएल 2024 च्या 17 व्या हंगामात केएल राहुलकडे लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व होते. यानंतर केएलच्या नेतृत्वाखाली लखनौचा संघ एक सामना पराभव झाला होता तेव्हा सामन्यानंतर केएलसोबतच्या व्हिडिओमध्ये संजीव गोयंका त्याच्यावर रागावलेले दिसून आले. त्यावेळी त्या दोघांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता.
आयपीएल 2025 मध्ये म्हणजेच या वर्षी पंत स्वतः कर्णधार म्हणून चांगली कामगिरी करताना दिसत नसताना तसेच त्यांचा संघही सामना हरत आहे, त्यामुळे संजीव गोयंका केएल राहुलप्रमाणेच पंतशी रागाने वागतील, असे सगळ्यांना वाटत होते. पण मंगळवारी पंजाबविरुद्धच्या पराभवात असे अजिबात दिसून आले नाही.
हेही वाचा : लखनऊच्या गोलंदाजांना घरच्या मैदानावर पंजाबच्या फलंदाजांनी पाजलं पाणी, PBKS ने संघाला 8 विकेट्सने मिळवला विजय
लखनऊ सुपर जायंट्स सामना हरल्यानंतर पंत आणि त्याचा मालक संजीव यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये ते पंतसोबत हसत-खेळत बोलत असल्याचे दिसत आहे. या काळात कर्णधार आणि लखनौचे मालक यांच्यात बराच वेळ चर्चा झालेली दिसली. बोलताना संजीव गोयंका यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले होते. यावरून लखनौ संघाचा मालक पंतवर अद्याप नाराज नसल्याचे स्पष्ट होते.