विराट कोहली, रोहित शर्मा यानी श्रेयस अय्यर(फोटो-सोशल मीडिया)
Bcci central contract : भारतात सध्या आयपीएल 2025 चा 18 व हंगाम जोरात रंगला आहे. या हंगामात भारतीय संघाचे सर्व खेळाडू मग्न झाले आहेत. दरम्यान, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डकडून टीम इंडियाच्या खेळाडूंचा नवीन केंद्रीय करार देखील जाहीर करणार असल्याचे समोर आले आहे. या केंद्रीय करारातील सर्वात मोठी बातमी अशी की, बीसीसीआयच्या केंद्रीय करारात श्रेयस अय्यरचे पुनरागमन झाले आहे. उल्लेखनीय असे की श्रेयस अय्यरला गेल्या वर्षी बीसीसीआयने त्याच्या केंद्रीय करारातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पण गेल्या काही काळापासून अय्यर टीम इंडियासाठी सातत्याने चमकदार कामगिरी करताना दिसत आहे. त्यासाठी आता बीसीसीआयनकडून त्याला ही एक भेट देण्यात आली आहे.
हेही वाचा : लखनऊच्या गोलंदाजांना घरच्या मैदानावर पंजाबच्या फलंदाजांनी पाजलं पाणी, PBKS ने संघाला 8 विकेट्सने मिळवला विजय
असे बोलले जात आहे की, बीसीसीआय अय्यरचा भारतीय संघाच्या अ श्रेणीमध्ये समावेश करू शकते. तसेच, बीसीसीआयकडून नवीन निर्णयामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गज खेळाडूंना केंद्रीय करारातील A+ ग्रेडमध्ये कायम ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या
दरम्यान युवा फलंदाज इशान किशनसाठी मात्र एक दुखद बातमी समोर येत आहे. गेल्या वर्षी श्रेयस अय्यरसह ईशान किशनला देखील बीसीसीआयच्या वार्षिक करारातून वगळण्यात आले होते. यावेळी बीसीसीआयकडून किशनला दिलासा देण्यात येईल असे वाटत असताना मात्र, तसे होताना दिसत नाहीये. एका मीडिया रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयने अद्याप इशान किशनचा वार्षिक करार यादीमध्ये समावेश केलेला नसून या यादीत ईशानचा समावेश होण्यास वेळ लागणार असल्याचे देखील बोलले जात आहे.
हेही वाचा : NZ vs PAK : पाकिस्तानचा खिसा होणार रिकामी! पराभवानंतर आयसीसीने जखमेवर चोळले मीठ, या चुकीमुळे ठोठावला दंड
रोहित शर्मा आणि विराट कोहलीसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी T20 फॉरमॅटमधून निवृत्ती घेतल्यानंतर देखील त्यांचा A+ श्रेणीतील करार कायम राहणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले गेले आहे. म्हणजे, हे दोन्ही खेळाडू T20 मधून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचा A+ ग्रेड केंद्रीय करार कायम असणार आहे. सध्या रोहित शर्मा आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे सर्वात सीनियर फलंदाज आहे. त्यामुळेच बीसीआयने या दोन खेळाडूंचा सन्मान राखल्याचे बोलले जात आहे. तसेच भारताचा दिग्गज अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाबाबत मात्र अद्याप कोणती बातमी समोर आलेली नाही.