
Asia cup 2025: Pakistan's surrender? India will soon get the Asia cup trophy! BCCI secretary gave an update, said...
Big update about the Asia Cup 2025 trophy : भारताने आशिया कप २०२५ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून जेतेपद जिंकले होते. परंतु, भारतीय संघाला अद्याप जेतेपदाची ट्रॉफी मिळाळेली नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळला आशा आहे की आशिया कप विजेत्यांचा ट्रॉफी “एक किंवा दोन दिवसात” मुंबईतील मुख्यालयात दाखवल होईल. परंतु जर परिस्थिती अशीच राहिली तर भारतीय मंडळ ४ नोव्हेंबर रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदकडे हा मुद्दा उपस्थित करणार. भारताने आशिया कप जिंकला, परंतु आशियाई क्रिकेट परिषद आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डचे अध्यक्ष असलेले पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांच्याकडून ट्रॉफी स्वीकारण्यास भारतीय संघाने नकार दिला होता.
दोन्ही देशांमधील सुरू असलेल्या वादामुळे भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन करण्यास नकार दिल्यानंतर मोठे वाद निर्माण झाले. नक्वी यांनी आधीच सांगितले होते की, ट्रॉफी भारताला सादर केली जाऊ शकते, परंतु ते वैयक्तिकरित्या ती सादर करतील. आशिया कप विजयानंतर एक महिन्याहून अधिक काळानंतर, बीसीसीआय अजून देखील ट्रॉफीच्या अधिकृत हस्तांतरणाची वाट पाहत आहे.
बीसीसीआयचे संयुक्त सचिव देवजित सैकिया यांनी दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, “एक महिना उलटून गेला तरी देखील ट्रॉफी आमच्याकडे न आल्याने आम्ही थोडे नाराज आहोत. आम्ही या प्रकरणाचा पाठपुरावा करत आहोत. सुमारे १० दिवसांपूर्वी एसीसी अध्यक्षांना पत्र लिहिले होते, परंतु त्यांच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही.” ते पुढे म्हणाले, “ट्रॉफी अजूनही त्यांच्याकडे आहे, परंतु आम्हाला आशा आहे की ती एक-दोन दिवसांत मुंबईतील बीसीसीआय कार्यालयात आमच्याकडे पोहोचेल.”
सैकिया पुढे म्हणाले की, जर ट्रॉफी लवकरच सुपूर्द करण्यात याअ;आय नाही, तर बीसीसीआय ४ नोव्हेंबरपासून दुबई येथे होणाऱ्या आयसीसीच्या तिमाही बैठकीत हा मुद्दा उपस्थित करणार आहे. बीसीसीआयने अधिकृतपणे ट्रॉफी परत करण्याची विनंती केली आहे, परंतु नक्वी यांनी सांगितले आहे की ते भारतीय खेळाडूंनी भविष्यातील कार्यक्रमात वैयक्तिकरित्या घेण्याचा सल्ला देत आहेत, कारण अद्याप कोणताही औपचारिक तोडगा निघालेला नाही.
सैकिया म्हणाले की, “बीसीसीआयच्या वतीने, आम्ही या समस्येवर लक्ष केंद्रित करत असून आणि मी भारतीय लोकांना खात्री देऊ शकतो की ट्रॉफी भारतात परत येणार, वेळ अद्याप अस्पष्ट आहे. पण एक दिवस ती येईल.”